अजून लोकसभा - राज्यसभा- आमदारकी- विधानपरिषद शिल्लक , बघू या काय काय होते: अरुण डोंगळे
schedule17 Sep 26 person by visibility 104 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : - 'कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची पुढील निवडणूक मी लढवणार नाही. मात्र राजकारणात मी सक्रिय असणार आहे. अजून लोकसभा, राज्यसभा, आमदारकी, विधान परिषद शिल्लक आहे बघू या काय काय होते...' अशी मिस्कील टिप्पणी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली.
गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी गुरुवारी 16 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी राजकीय टिप्पणी केली. गोकुळची पुढील निवडणूक लढवणार नाही असे मी म्हटले आहे. मात्र राजकारणात मी कायम सक्रिय असणार आहे. पुढील निवडणूक मी लढवणार नाही असे म्हटल्यावर कार्यकर्ते खुश आहेत. कारण कार्यकर्त्यांच्या पैकी एकाला संधी मिळते असे उद्गगार त्यांनी काढताच कार्यकर्त्यांनाही हसू आवरले नाही.
राजकारणात मी कायम सक्रिय राहणार आहे अजून लोकसभा, राज्यसभा, आमदारकी, विधानपरिषद शिल्लक आहे... बघू या काय काय होते असे सांगत त्याने पुढील राजकारणाचे संकेतही दिले. कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन न करता अर्ज दाखल असेही त्याने सांगितले. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले गोकुळच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने अर्जांची विक्री झाले आहे याकडे लक्ष वेधले असता अरुण डोंगळे म्हणाले दोन दिवसांमध्ये सहाशेहून अधिक अर्जांची विक्री झाले आहे. अर्ज विक्री मोठ्या प्रमाणात झाले असली तरी विविध ठिकाणी अनेकांना संधी दिली जाते यातून मार्ग निघेल असेही ते म्हणाले.