Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गणेशभक्तांसाठी खुशखबर, घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धाक्रिडाई कोल्हापूरतर्फे राष्ट्रीय अभियंता दिननृत्यांगना वर्षा  खाडिलकर, निधी आलासेंच्या नृत्याविष्काराने रसिक-प्रेक्षक मंत्रमुग्धगोकुळच्या निवडणुकीसाठी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर,  बाळासाहेब खाडेंचे अर्ज दाखलमुश्रीफांनी जाहीर केलेल्या गोकुळच्या ठराव संख्येवरून भाजपच्या नेत्यांना मिरचीचा ठसका का लागला ? युवराज पाटील हसन मुश्रीफांचे भाजपला थेट चॅलेंज ! गोकुळसाठी कोल्हापुरात ठरावांची बेरीज, पदवीधर आमदारकीसाठी सांगलीत शड्डू !!जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मान

जाहिरात

 

गणेशभक्तांसाठी खुशखबर, घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धा

schedule16 Sep 26 person by visibility 18 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: गणेशोत्सव हा उत्साहाचा, आनंदाचा, मांगल्याचा उत्सव. गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी घरोघरी आकर्षक देखावा, आरास केली जाते. वेगवेगळया संकल्पनेवर आधारित देखावा तयार करताना गणेशभक्त कसलीही कसर सोडत नाहीत. गणेशभक्तांच्या या कलाकौशल्याचे कौतुक करण्यासाठी महाधुरळा यूट्यूब चॅनेलतर्फे ‘घरगुती गणेशोत्सव देखावा’स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी, ‘घरात केलेल्या देखाव्याचा तीस सेकंदापर्यंतचा व्हिडिओ अथवा फोटो पाठवावा. सोबत गणेशभक्तांनी, आपले नाव, पत्ता आणि मोबाइल नंबर पाठवावा. व्हिडीओ पाठविण्याचा कालावधी १४ ते २० सप्टेंबर २०२६ असा आहे. घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धा अंतर्गतचे व्हिडिओ विजय टिपुगडे ९५४५५००८५१  व प्रवीण वाघमारे ९७६७७७४७४६ यांच्या मोबाइल नंबरवर पाठवावेत. असे आवाहन महाधुरळा यूट्यूब चॅनेलचे संपादक गुरुबाळ माळी यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी प्रयोदी सोशल अँड कल्चरल फाऊंडेशन, स्वराज्य महिला मंच व दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट कला महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes