+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Dec 22 person by visibility 355 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या मातोश्री मोहनाबाई आकाराम माळवी यांच्या स्मरणार्थ मोफत अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रदान समारंभ नुकताच झाला. मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे , केंद्रीयमंत्री रामदास आठवले, मंंत्री गुलाबरावव पाटील, दादा भुसे, अब्दुल सत्तार, खासदार धैर्यशिल माने मान्यवर यांच्या हस्ते चव्हाण प्रतिष्ठान सेन्टर, मुंबई येथे कार्यक्रम झाला.
 मुख्यमंत्री आरोग्य मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रुग्णसेवक शिबिर समारोप समारंभ झाला. याप्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आपल्या आई दिवंगत श्रीमती मोहनाबाई माळवी यांच्या स्मरणार्थ स्व.खर्चातून जनतेसाठी मोफत आरोग्य सेवा म्हणून रुग्ण्वाहिका प्रदान केली. ही रुग्णवाहिका पन्हाळा तालुक्यातील पोहाळे-वाळोली,बाजार भोगाव गोरगरीब जनतेसाठी उपलब्ध असणार आहे.
 मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते   पोहाळेचे प्रा.अशोक पाटील, वाळोलीचे रघुनाथ पाटील यांना रुग्ण वाहिका चावी प्रदान समारंभ झाला. याप्रसंगी प्राअर्चना माळवी, प्रा.दिनकर पाटील, कोंडीराम पाटील, हरिष वडणगेकर,बाळ पाटील, किसन माळवी उपस्थित होते.