+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Sep 22 person by visibility 336 categoryउद्योग
केआयटीमध्ये 'वॉक विथ वर्ल्ड'तर्फे  फ्लायर्स कार्यशाळा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
"व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग ही काळाची गरज आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची छाप दुसऱ्यावर पडणे तितकेच महत्वाचे आहे" असे मत  सुप्रसिद्ध डीपी मीडिया हाऊसच्या सीईओ देवयानी पवार यांनी व्यक्त केले. त्या कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयातील 'वॉक विद वर्ल्ड' या विद्यार्थी समितीने आयोजित केलेला फ्लायर्स 2022 या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या वेळी  केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी  अध्यक्षस्थानी तर  विद्यार्थी उपक्रम प्रमुख डॉक्टरअक्षय थोरवत, उदय भापकर, ड़ॉ . अमित सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 जिनिव्हा येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करून नुकत्याच परतलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या देवयानी पवार यांनी मार्केटिंग या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या ‘कोरोना महामारी मध्ये ऑनलाइन नसणाऱ्या व्यवसायांना भयंकर फटका बसला व ते न होण्यासाठी व्यवसाय ऑनलाइन नेणे व त्याचे मार्केटिंग करणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले’. ग्राहकांची गरज व बाजार परिस्थिती ओळखून व्यवसायात उतरणे किती फायदेशीर आहे हे त्यांनी सांगितले. ”तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचे आहे हे तुम्ही ओळखा व तेच ध्येय प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करा” असा सल्ला पवार यांनी दिला. ’’कौशल्य ही जन्मताच मिळत नसतात तर ती मिळवावी लागतात . मी माझी कंपनी कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय चालू केली व वाढवली. संवाद कौशल्य व तसेच भावनात्मक गुणांक  हा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे असे त्या  म्हणाल्या.
  कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिग्यान कार्यक्रम प्रमुख ऋषिराज बुधले यांनी कार्यक्रमाची माहिती दिली व यावर्षीच्या  अभिग्यान सोहळ्याची तारीख 13 नोव्हेंबर असेल हेही जाहीर केले.कार्यक्रमात फ्लायर्स प्रमुख प्रांजली सूर्यवंशी यांनी फ्लायर्स कार्यक्रमाची व्यापक माहिती दिली.केआयटीचे संचालक मोहन वनरोटी यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच अभ्यासेतर उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. समितीचा विद्यार्थी अध्यक्ष ऋत्विक देशपांडे, कार्यक्रम प्रमुख प्रांजली सूर्यवंशी, अभिनय सहारे, श्रेया देसाई, जान्हवी कलांत्रे आदी उपस्थित होते.   वॉक विथ वर्ल्डच्या सेक्रेटरी चेतना लुल्ला यांनी आभार मानले.