+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule18 Oct 24 person by visibility 128 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्यावतीने आयोजित झिम्मा-फुगडी सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाली. राधानगरी तालुक्यातील घोटवडे  येथे स्पर्धा झाली.  स्पर्धेचे उद्घाटन गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांच्या हस्ते झाले . 
    गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे. अभिषेक डोंगळे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून त्यांचे समाजकारण चांगले आहे. अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या माध्यमातून नेहमीच गरजवंतांना आधार देण्याचं काम केलं जाते.
 अभिषेक डोंगळे म्हणाले, डोंगळे परिवाराची समाजकार्याची परंपरा यशस्वीरित्या माझ्या हातून पुढे चालविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असून युवाशक्तीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यासाठी अविरत काम सुरु आहे.  युवाशक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे यांनी युवाशक्तीच्या कामाचा आढावा घेवून भविष्यात आणखीन जोमाने युवाशक्ती समाजकार्य करेल. माणूस म्हणून अभिषेक डोंगळे यांना पाठबळ देण्याचे नमूद केले. यावेळी राजश्री डोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. देवबा पाटील व प्रा.एम. पी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.      
यावेळी धीरज डोंगळे, वंदना चौगले, कल्पना मोरे, आरती तायशेटे, अमृता डोंगळे, भाग्यश्री डोंगळे, राजश्री डोंगळे, चैत्राली डोंगळे, दीपाली पाटील, मनीषा किरुळकर, सरीता पौडकर, अमृता चौगले, राजू चौगले, मुकुंद पाटील, शिवाजी डोंगळे, संग्राम मगदूम, सुहास डोंगळे, उदय पाटील, पवन गुरव आदी उपस्थित होते.