+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Jan 23 person by visibility 626 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलचा विजय असो, एकच झलक- २१ सलग"अशा घोषणा आणि हलगीचा कडकडाट अशा उत्साही वातावरणात श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलने शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात प्रचारफेरी काढली. विमान चिन्हाचे फोटो असलेल्या टोप्या, गळ्यात मफलर परिधान करुन सभासद व उमेदवार प्रचारफेरीत सहभागी झाले. जिल्हा परिषदेच्या आवारात सभा झाली. या सभेत सोसायटीचे विद्यमान चेअरमन राजीव परीट, महावीर सोळांकुरे, विजय गवंडी यांची भाषणे झाली. त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.    "सोसायटीचे माजी चेअरमन व पॅनेल  प्रमुख एम. आर. पाटील व  सुकाणू समिती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीने नेत्रदीपक कामगिरी केले आहे. या निवडणुकीत  सत्तारुढ आघाडीला सभासदांचा मोठा पाठिंबा आहे. निश्चितच महालक्ष्मी आघाडी विजयी होईल" असा विश्वास राजीव परीट व महावीर सोळांकुरे यांनी  व्यक्त केला. यावेळी शिक्षक नेते कृष्णात कारंडे,  शिक्षक बँकेचे संचालक एस. व्ही. पाटील यांची भाषणे झाली. कारंडे व पाटील यांनी " जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमधील सत्तारुढ आघाडीच्या कारभार कौतुकास्पद आहे. शिक्षक वर्गातून मोठे मताधिक्य या आघाडीला मिळेल" अशी ग्वाही दिली. अजित मगदूम म्हणाले, "निवडणुकीच्या प्रचार कालावधीत महालक्ष्मी पॅनेलला सभासदांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सोसायटीच्या निवडणुकीत पुन्हा महालक्ष्मी आघाडी विजयी होणार असाच  सभासदांचा कौल दिसत आहे."  दरम्यान  प्रचार फेरीत शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, रामदास झेंडे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, शिक्षक संघाचे करवीर तालुका पदाधिकारी मारुती दिंडे, परिचर संघटनेचे दगडू परीट, कर्मचारी महासंघाचे सचिव अजित मगदूम, एफ.एम.फरास, कर्मचारी युनियनचे सचिव अमोल घाडगे, लिपिक वर्गीय संघटनेचे उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे यांचा सहभाग होता. सभा झाल्यानंतर उमेदवाराने जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना भेटून आघाडीला निवडून  देण्याची विनंती केली.
  या रॅलीमध्ये सत्तारूढ आघाडीच्या सगळ्या उमेदवारांचा सहभाग होता. उमेदवार अमर पाटील जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, रवींद्र जरळी, अजय शिंदे, महावीर सोळांकुरे, श्रीकांत चव्हाण,सुनील पाटील, बाजीराव पाटील, सचिन गुरव, सरदार दिंडे, नंदीप मोरे, रणजीत पाटील, साताप्पा मगदूम, जयकुमार रेळेकर, सुधाकर कांबळे, उत्तम वावरे, मुजमिल नावळेकर, सरोजिनी कोर सोनाली गुरव यांचा सहभाग होता.