+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule15 Jul 24 person by visibility 320 categoryलाइफस्टाइल
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फोटोग्राफर्स असोसिएशन तसेच कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुपच्यावतीने खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोल्हापुर जिल्हयातील हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी खुली असलेली ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी हेरिटेज कोल्हापूर आणि निसर्ग असे दोन विषय ठेवले आहेत.  अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पर्धेला कोणतेही प्रवेश शुल्क नाही. 
स्पर्धेतील सहभागी चित्रांचे प्रदर्शन १७ ते १९ ऑगस्ट या काळात शाहू स्मारक भवनमध्ये भरवण्यात येणार आहे, १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून खुली छायाचित्रण स्पर्धा होत आहे. यामध्ये   पहिल्या विभागात कॅमेराद्वारे काढलेले (डी एस एलआर अथवा मिररलेस कॅमेरा) १२ बाय १८ इंचाची प्रिंट आणि १६ बाय २२ इंच माऊंट (ऑफव्हाईट) अशा प्रकारचे छायाचित्र तर दुसर्‍या गटात मोबाईलद्वारे काढलेेले ८ बाय १२ इंच आणि १२ बाय १६ इंच माऊंट (ऑफव्हाईट) अशा गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी छायाचित्र प्रिंट आणि माऊंट स्पर्धकांनी स्वतः करून आणायचे आहे. छायाचित्राच्या माऊंटच्या मागे स्पर्धकाचे नाव, मोबाईल नंबर आणि कॅमेरा किंवा मोबाईलचा मॉडेल नंबर टाकायचा आहे. छायाचित्रावर पुढील बाजूस स्पर्धकाचे नाव किंवा वॉटरमार्क असेल तर अशी कलाकृती स्पर्धेत ग्राहय धरली जाणार नाही. दिलेल्या विषयानुरूप छायाचित्रांचेच परिक्षण केले जाईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. छायाचित्रे जमा करण्याची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत आहे. 
स्पर्धेसाठी आलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन १७ ते १९ ऑगस्ट या दरम्यान राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये होणार आहे. १७ ऑगस्टला छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ होईल. त्याचवेळी दोन्ही गटातील विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. १९ ऑगस्टला स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होईल. कॅमेरा विभागासाठी प्रथम क्रमांक ५००१ रूपये, ट्रॉफी आणि सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक ३००१ रूपये, तृतीय क्रमांक २००१ रूपये आणि उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना प्रत्येकी १००१ रूपये , ट्रॉफी आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे. 
 मोबाइल विभागासाठी अनुक्रमे ३००१, २००१ आणि १००१ तसेच उत्तेजनार्थ ५०१ रूपयांची दोन बक्षिसे ट्रॉफी आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे. 
स्पर्धकांनी १० ऑगस्टपर्यंत आपले छायाचित्र मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डींग समोरील सर्व्हेश फोटोग्राफीक्समध्ये (९८ २३ ६९ ७२ २२ किंवा ९४० ४७ ०० ७०४) मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समधील बालाजी फोटोस्टुडीओ (९९ ७० ७२७ ५६० किंवा ९३ ७१ ११ १५ ९५) राजारामपुरी सहाव्या गल्लीतील उत्सव फोटो स्टुडिओ (९३ ७१ १० ८७ ४७), कळंब्यातील अरिहंत फोटोस्टुडिओ (९८ ९० ८९ २९ २२) किंवा शाहूपुरी चौथ्या गल्लीतील हर्ष ग्राफीक्स अ‍ॅन्ड व्हिडीओज (९० ६७ ५६ २७ ८९) या ठिकाणी छायाचित्र जमा करायचे आहे, असे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेलाडॉ. मीरा कुलकर्णी, संजीव देवरुखकर,  सर्वेश देवरूखकर, किशोर पालोजी, विनोद चव्हाण, संजय जोशी आदी उपस्थित होते