कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता, कॉमन मॅनसाठी देहभान हरपून काम करणारे नेतृत्व !
schedule09 Feb 25 person by visibility 242 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर जिल्ह्यावर २०१९ मध्ये महापुराची आपत्ती कोसळली, अनेक गावांना पाण्यांनी वेढलं. मदत यंत्रणा राबविण्यातही अडचणी उदभवत होत्या…या कालावधीत तत्कालिन नगरविकासमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात दाखल झालं. शासकीय यंत्रणा गतीमान केली. पंधरा दिवस कोल्हापुरात होते…दिवस-रात्र कामात. पूरग्रस्तांच्या मदतकार्यावर लक्ष. रात्रीचे अडीच वाजलेले… आंबेवाडीतील काही लोकांना मदतीची गरज होती. मंत्री शिंदे यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचली…त्यांनी मदत यंत्रणा गतीमान तर केलीच शिवाय शेकडो लोकांसाठी फूड पॉकेटस पाठविले....महापुराच्या कालावधीत २५० ट्रक धान्य, संसारोपयोगी साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविले…ही काही प्रातिनिधीक उदाहरण… संकटकाळात लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे…कार्यकर्त्यांना बळ देणारा नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे !
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर हे शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडत होते. शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. शिवसेनेतर्फे यंदा हा वाढदिवस ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून क्षीरसागर यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाशझोत टाकला. शिंदे यांचे पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासू सहकारी म्हणून क्षीरसागर यांची ओळख. पक्षीय संघटनेचे कार्य असो की अन्य महत्वाचे कार्यक्रम…शिवसेनेचे अधिवेशन असो की शिवकार्य अभियान…प्रत्येकवेळी शिंदे यांनी क्षीरसागर यांच्यावर विश्वास व्यक्त् केला. त्यांच्यावर जबाबदारी सोपविली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या तत्वानुसार काम करण्याची शिकवणीनुसार आमचं कार्य सुरू आहे.
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना बळ देण्याची भूमिका साऱ्यांनाच सुखावहणारी आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर यांना विजयाने हुलकावणी दिली. क्षीरसागर यांच्या पराभवाने त्यावेळी शिंदे ही हळहळले होते. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री शिंदे हे पंधरा दिवसात कोल्हापूर दौऱ्यावर आले. क्षीरसागर यांना सोबतीला घेऊन महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. कार्यकर्त्यांना ताकत देण्याची त्यांची भूमिका आणखी ठळक झाली. पक्षाने राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपविली. पुढे मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मंत्र्यांचे अधिकार दिले.
नगरविकासमंत्री, मुख्यमंत्री व आता उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी नेहमीच कोल्हापूरला झुकते माप दिले. शहर आणि जिल्हयाचा विकासाच्या प्रकल्पांना गती दिली. विकास योजना मंजूर केल्या. रंकाळा तलाव संवर्धन-सुशोभिकरण असो की महापालिकेच्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याचा निर्णय असो यासाठी त्यांनी विलंब लावला नाही. वेळ-काळ पाहिला नाही. रात्री अडीच-तीन वाजता त्यांनी सचिवांना फोन करुन लोकांची कामे मार्गस्थ लावली. सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या एसटीचा खोळंबा आकार रद्द करण्यासंबंधी पहाटे तीन वाजता त्यांनी सचिवांना फोन केला होता. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रस्तावावरही त्यांनी रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान स्वाक्षरी केली होती. शेवटच्या घटकातील माणसाच्या समस्या सुटत नाही, तोपर्यत झोपायचं नाही ही त्यांच्या कामाची पद्धत…साऱ्यांनाच समाजासाठी काम करण्यासाठी प्रेरणा देणारी ठरते…अशा शब्दांत क्षीरसागर यांनी भावना व्यक्त केल्या.