Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महाडिकांची कार्यपद्धती, सामान्य माणसाला पद ! चालक बनला संचालक, शेतकऱ्यांचाही सन्मान!! सारस्वत विकास मंडळातर्फे महिलांचा सन्मानशिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणामंत्र्यांसोबत बैठककेआयटीमध्ये गुरुवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यानविद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली रंगआम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग 2025' स्पर्धेला सुरुवात, बुधवारी बक्षीस समारंभ आरडी सिनेमातून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणामकेआयटीला आयएसटीईचा बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट पुरस्कारसमिधा प्रतिष्ठानतर्फे महिला दिन-पुरस्कार वितरण समारंभ उत्साहातमहायुतीचे नेते म्हणतात राज्याचा अर्थसंकल्प लोकाभिमुख ! काँग्रेसच्या आमदारांचे टीकास्त्र !!

जाहिरात

 

विट्यात रविवारी ४३ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

schedule05 Feb 25 person by visibility 114 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील विटा येथे रविवारी, (९ फेब्रुवारी २०२५) ४३ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. भारतमाता ज्ञानपीठ या संस्थेतर्फे संमेलनाचे आयोजन केले आहे.  राधा -रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयाच्या प्रांगणात  संमेलन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस असणार आहेत. अशी माहिती संयोजक रघुराज मेटकरी यांनी दिली.
 यादिवशी सकाळी ९.३० वाजता कवठेमहाकांळ नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून संमेलनाची सुरुवात होणार आहे. कवी आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन आहे. त्यामध्ये अनेक कवी सहभागी होणार आहेत. दुसरे सत्र दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र शासनाचे डॉ. ओमप्रकाश शेटे  करणार आहेत. आमदार डॉ. विश्वजीत कदम हे प्रमुख पाहुणे आहेत. स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. दिनकर पाटील  आहेत. तिसऱ्या सत्रात रात्री ८.३० वाजता कथाकथन व संमेलन समारोप आहे. प्रमुख पाहुणे प्रा. सिद्धेश्वर सपकाळ आहेत. प्रा. विश्वनाथ गायकवाड, नागु विरकर, जयवंत आवटे यांचे कथाकथन आहे.
प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री पु. ल. देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा पुरस्कार प्रा. विश्वनाथ गायकवाड व श्रीमती शकुंतला अण्णा होनमाने व आदर्श शिक्षक पुरस्कार संपत शेळके यांना व ज्ञानोबा बापू काळे उत्कृष्ट वांड्मय निर्मिती पुरस्कार डॉ. मुरहरी केळे यांना व हौसाबाई ज्ञानोबा काळे उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार प्रा. डॉ. श्रुती श्री वडगबाळकर व साहित्यिक द.का.हसमनीस उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार प्रा.डॉ. विनोद गायकवाड यांना देण्यात येणार आहे. साहित्यिक सुनील दबडे यांच्या 'बनगी आणि बिरमुटं' कथासंग्रह व साहित्यिक रमेश गायकवाड यांच्या 'पर्यावरणाचा छोटा रक्षक"एकांकिका संग्रहाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठीडॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर, अरुण लंगोटे , हर्षवर्धन मेटकरी आदी  योगदान देत आहेत. वाचनप्रेमींनी या संमेलनास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes