+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Sep 22 person by visibility 1247 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : “सभासदांना २२ टक्के लाभांश, वैयक्तिक कर्ज मर्यादा ४० लाखापर्यंत, सभासदांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता पाच लाखांचे कर्ज, सभासद व पाल्यांसाठी लॅपटॉप व टॅबसाठी बिनव्याजी कर्ज योजना”अशा महत्वपूर्ण घोषणा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. चेअरमन डॉ. दत्तात्रय घुगरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. 
  दरम्यान या सभेत सत्ताधारी आघाडीच्या समर्थक सभासदांचा अतिउत्साहीपणा आणि माजी संचालकांच्या अरेरावीपणामुळे सभेत काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सत्ताधारी आघाडीच्या एका माजी पदाधिकाऱ्यांने २१ विरुद्ध शून्य अशा घोषणा देत वार्षिक सभेला जणू सत्ताधारी मेळाव्याचे स्वरुप दिले. याला विरोधी आघाडीच्या काही सभासदांनी आक्षेप घेतला. तेव्हा सत्ताधारी समर्थक त्यांच्या अंगावर धावून गेले. गोंधळात व्यासपीठासमोर एक जण पायरीवरुन घसरला. शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन घुगरे यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत सभा पुन्हा सुरळीत केली. जवळपास तीन तास सभा चालली. विरोधकांविना झालेल्या सभेत सत्ताधारी समर्थकांकडूनच गोंधळाचा प्रकार घडला.
 जुलै २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर कोजिमाशिची ही पहिलीच सभा. मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदिर येथे सभा झाली. सभेत निवडणुकीचे पडसादही उमटले. माजी संचालकांनी एकत्र येते सत्तारुढ आघाडीचे नेते लाड यांचा सभेच्या प्रारंभीच सत्कार केला. शिक्षक नेते लाड यांनी भाषणात ‘निवडणूक झाली आणि विरोध संपला, आता आपण सगळे पतसंस्थेचे सभासद आहोत. कारभार करताना सत्ताधारी आणि विरोधक असा दुजाभाव करणार नाही’अशी ग्वाही दिली. २००५ ते आजअखेर मयत सभासद कर्जमाफी योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांचे कर्जमाफी दिली. आता या कर्जमाफीच्या पोटनियमात दुरुस्तीची गरज आहे. या योजनेतंर्गत कर्ज घेतल्यानंतर सभासद तीन महिन्यानंतर मयत झाला तरच संपूर्ण कर्जमाफी मिळेल. अपघाती निधन झाल्यास मात्र तीन महिन्याची अट नाही असे लाड यांनी स्पष्ट केले. हा ठराव सभेने मंजूर केला. निवडणुकीत सभासदांना दिलेला वचननामा येत्या पाच वर्षात पूर्ण करू असेही लाड यांनी सांगितले. दरम्यान सभेला सुरुवात होताच विरोधी आघाडीचे बाबा पाटील, सुरेश संकपाळ, उदय पाटील, समीर घोरपडे, संजय डी. पाटील कुडित्रे, अजित रणिदवे, शिवाजी कोरवी सभास्थळातून बाहेर पडले. 
चेअरमन दत्तात्रय घुगरे यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सांपत्तिक स्थितीची आकडेवारी मांडत घुगरे यांनी येत्या वर्षात ६०० कोटीचा ठेवींचा टप्पा पार करू. आजअखेर संस्थेच्या कोटी ५३२ कोटीपर्यंत पोहचल्या. कर्ज वाटप ४२५ कोटीपर्यंत झाले आहे. पतसंस्थेला अहवाल सालात चार कोटी ५५ लाख ६९ हजार ८५४ रुपये नफा झाला आहे. सभासदांना यंदा २२ टक्के लाभांश वाटप होणार आहे. २७ सप्टेंबरपासून लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा होईल. संस्थेतर्फे सभासदांना दिवाळी भेट म्हणून दहा लिटरचा तेलाचा डबा आणि एक किलो बासमती तांदूळ दिले जाईल असे घुगरे यांनी घोषित केले.
………
सभासदाचे लांबलेले भाषण, समर्थकांची अरेरावी
मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी सभेपुढील विषयाचे वाचन केले. प्रश्नोत्तरादरम्यान सभासद अण्णासाहेब चौगुले यांचे भाषण लांबले. तेव्हा काही जणांनी त्यांना अवांतर बोलू नका,थोडक्यात प्रश्ने विचारा असे बजावले.काही जण व्यासपीठावर जाऊन भाषणात व्यत्यय  आणला. मचौगुले व्यासपीठावर गोंधळ झाला. या गोंधळातही चौगुले यांनी भाषण चालूच ठेवले. तेव्हा सत्तारुढ समर्थक सभासद आक्ररम झाले ‌‌ चौगुले यांना बोलण्यास मज्जाव करण्याचा प्रकार घडला. या गोंधळात एक सभासद पायरीवरुन घसरला. व्यासपीठावर गोंधळ वाढल्याने पोलिसांनी  व्यासपीठावर येत  सभासदांना बाजूला केले. 
 …………………….. सत्तारूढच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या विधानाने सभेत गोंधळ, विरोधकांचा आक्षेप
माजी उपसभापती संजय परीट यांनी प्रश्ने विचारण्याऐवजी भाषण केले. त्यावरुन विरोधी सभासदांनी, परीट यांनी वार्षिक सभेला राजकीय व्यासपीठ बनविले व सत्तारुढच्या मेळाव्याचे स्वरुप दिले अशी टीका केली. मात्र परीट यांनी  वार्षिक सर्वसाधारण सभेचे भान न ठेवता  निवडणुकीचा संदर्भ घेत  म्हणाले, ‘सभेत विरोधक नाहीत, त्यांचे नेते नाहीत. निवडणुकीतील एकतर्फी विजयामुळे सभेत आपण २१ विरुद्ध शून्य अशा घोषणा देउ. ’असे म्हणत घोषणा द्यायला सुरुवात केली. इतरांनी त्यांना साथ दिली. परीट यांनी “आमदार जयंत आसगावकर यांना उद्देशून निवडणुकीत वाहने तुमची, पण मतदार आमचे होते. आमदारांनी सभासदांचा कौल मान्य करावा. आणि चांडाळ चौकडींना दूर ठेवावे.’ अशा शब्दांत वार्षिक सभेच्या व्यासपीठावरुन विरोधकांना डिवचले. विरोधी आघाडीत सामील झालेल्या एका माजी पदाधिकाऱ्याला उद्देशून, ‘हलगी वाजवत नाच्या नाचला’अशी टीका केली. परीट यांच्या टीकेला विरोधी आघाडीचे श्रीधर गोंधळी यांनी आक्षेप घेतला.‘हे राजकीय व्यासपीठ नाही. संस्थेची वार्षिक सभा आहे. पतसंस्थेविषयी बोला’असा पलटवार केला. यावेळी सत्तारुढ आघाडीचे माजी पदाधिकारी कैलास सुतार, विलास डवर त्यांच्या दिशेने धावले. गोंधळी यांना बोलू दिले नाही. सत्तारूढच्या अन्य समर्थकांनी गर्दी केल्याने गोंधळात आणखी भर पडली. 
…………………
सत्तारुढ आघाडीच्या काही मंडळींनी वार्षिक सभेला राजकीय स्वरुप दिले. अंगावर धावून जाणे, बोलू न देणे हे प्रकार अशोभनीय आहेत. लाभांश वाटपातही यंदा कपात केली. एक अंकी व्याजदराचा शब्द पाळला नही.  सभासदांचा हिरेमोड केला. ”
-श्रीधर गोंधळी, सभासद कोजिमाशि (विरोधी आघाडीचे उमेदवार २०२२)
…………
“संस्थेने सभासद हिताच्या विविध योजना आखल्या आहेत. मोबाइल अप, एटीएम सुविधा, कोअर बँकिग सुविधा प्रस्तावित आहे. स्वच्छ-सुंदर शाळा पुरस्कार, शिक्षक –कर्मचारी पुरस्कार लवकरच घेउ. महिला सखी मंच स्थापन करू.”
-प्राचार्य दत्तात्रय घुगरे, चेअरमन कोजिमाशि
…………..