+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Jul 22 person by visibility 701 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
राज्यात सत्ताबदल करून पुन्हा एकदा समविचारी सरकार स्थापन केल्याबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली.
कोल्हापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील वाढती कर्करोग रुग्णांची संख्या लक्षात घेऊन, जिल्ह्यामध्ये कर्करोग उपचार कक्षाची स्थापना करावी या मागणीचे निवेदन माजी आमदार महाडिक यांनी फडणवीस यांना दिले.
सरकारी रुग्णालयात प्रभावी उपचार यंत्रणा उपलब्ध नसल्याने बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतात. काहींना शासकीय योजनांचा लाभ मिळतो पण खासगी रुग्णालयात उपचार घेताना अनेकांचे भरमसाठ पैसेही खर्च होतात. याचा विचार करून कोल्हापूर जिल्ह्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये अथवा स्वतंत्रपणे तातडीने कर्करोग उपचार कक्ष (कॅन्सर सेंटर) सुरू करण्याबाबत संबंधित खात्यांना आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी महाडिक यांनी केली आहे.