+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule21 Jul 24 person by visibility 211 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकात आतापासूनच शह, काटशह सुरू झाले आहेत. सरकारची ध्येयधोरणे, पक्षीय भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नेतेमंडळीवर जबाबदारी सोपविली आहे. भाजपच्या या फौजेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार पंकजा मुंडे, आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदींचा समावेश आहे. भाजपाच्या या रणनितीला सक्षमपणे टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेही नेते व प्रवक्ते मिळून पंधरा जणांची विशेष टीम केली आहे. यामध्ये अनुभवी आणि तरुण नेतेमंडळीचा समावेश आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख यांचाही समावेश आहे.
  महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते सत्ताधाऱ्यांची बाजू नेटाने मांडत असतात. सत्ताधारी आघाडीशी निगडीत पक्षाचे आयटी सेलकडून विरोधी आघाडीतील नेते मंडळीविषयी समाजात संभ्रमावस्था निर्माण केला जातो. छायाचित्र,भाषणाचे व्हिडिओ यामध्ये छेडछाड करुन समाजात दिशाभूल करण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या खोटया प्रचाराला सडतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेसने पंधरा जणांची टीम तयार केली आहे. 
 प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांचा समावेश आहे. प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजीत देशमुख, प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा मिळून एकूण पंधरा नेते मंडळीवर जबाबदारी सोपविली आहे. समन्वयाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्यवक श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे आहे. या साऱ्या नेते मंडळींनी काँग्रेस पक्षाची भूमिका, ध्येयधोरणे जनतेसमोर मांडायची आहेत. विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे.