महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार परिणय फुके, सचिवपदी निरंजन गोडबोले ; कोल्हापूरचे भरत चौगुले खजिनदार*
schedule26 Nov 25 person by visibility 94 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :- महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी गोंदियाचे आमदार व माजी मंत्री डॉ. परिणय फुके, सचिवपदी पुण्याचे निरंजन गोडबोले, कार्याध्यक्षपदी जळगावचे सिद्धार्थ मयूर व खजिनदारपदी कोल्हापूरचे भरत चौगुले यांची बिनविरोध निवड झाली.
जळगाव येथील जैन हिल्स मध्ये महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 2025 ते 28 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व आधारस्तंभ अशोक भाऊ जैन (जळगाव) यांच्या व सर्व जिल्ह्याच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत निवडणूक अधिकारी म्हणून अँडव्होकेट चंद्रशेखर जामदार यांनी काम पाहिले तर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष अनिल कुमार रायझदा (लखनऊ) हे निरीक्षक म्हणून आले होते. यामध्ये अकरा पैकी दहा जागी बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली : उपाध्यक्ष - सुनील रायसोनी (नागपूर), चिदंबर कोटीभास्कर (सांगली) व श्रीराम खरे (रत्नागिरी) सहसचिव - अश्विन मुसळे (चंद्रपूर), डॉक्टर दीपक तांडेल (ठाणे) व सतीश ठाकूर (जालना) खेळाडू प्रतिनिधी :- ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे (पुणे), ग्रँडमास्टर विदीत गुजराथी (नाशिक), महिला ग्रँडमस्टर स्वाती घाटे (पुणे) व सौम्या स्वामीनाथन (पुणे) स्वीकृत सदस्य:- उपाध्यक्ष - राजेंद्र कोंडे (पुणे), सहसचिव अंकुश रक्ताडे (बुलढाणा) व रवी धर्माधिकारी (जळगाव)
या नूतन कार्यकारणी मध्ये तज्ञ प्रशासक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रँड मास्टर बुद्धिबळपटू व सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधींचा समतोल साधल्यामुळे महाराष्ट्राच्या बुद्धिबळाचा पायाभूत विकास वेगाने होईल व चेस लीग,चेस इन स्कूल,गुणवंत बुद्धिबळपटूंना प्रगत प्रशिक्षण या सारखे उपक्रम जोमात राबवले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.