सत्यजीत जाधवांची प्रभाग विकासाची अष्टसूत्री संकल्पना, मतदारांना वाटतेय आपलीशी !
schedule11 Jan 26 person by visibility 37 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करुन घेण्यासाठी प्रत्येक पक्ष व आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध झाले. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत. यासाठी विविध योजना, विकासकामांची घोषणा सुरू आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक अकरामधील महायुतीचे उमेदवार व तरुण उद्योजक सत्यजीत जाधव यांनी ‘माझा प्रभाग…माझा वचननामा’हे सूत्र ठरवित अष्टसूत्री विकास कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये संपूर्ण प्रभागाच्या विकासाचा आराखडा आहे. या तरुण उमेदवारांची प्रभाग विकासाची अष्टसूत्री संकल्पना मतदारांना आपलीशी वाटत आहे.
जाधव कुटुंबीयांने, ‘जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांच्यासाठॅ हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. उमेदवार सत्यजीत जाधव यांनी, ‘महिलांसाठी सुरक्षित, सन्मानाचा प्रभाग’संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांसाठी आरोग्य शिबिरे, बचत गटांना प्रोत्साहन व रोजगाराच्या संधीचा समावेश् आहे. दुसरा विकास कार्यक्रम म्हणजे तरुणांसाठी कौशलय व रोजगार मार्गदर्शन केंद्र, स्टार्टअप व स्वयंरोजगार उपक्रमांना पाठबळ, स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका व डिजीटल लायब्ररी प्रस्तावित आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मान व सुरक्षितता अतंर्गत आरोग्य तपासणी व मदत कक्ष, उद्यानात ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा, सार्वजिनक ठिकाणी रॅम्पच सुविधा, आतप्कालीन मदत यंत्रणा या योजना आहेत. विद्यार्थ्यासाठी गुणवत्तापूर्ण सुविधावर फोकस ठेवला आहे. यामध्ये डिजीटल शिक्षण सुविधा व ग्रंथालय, गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केली जाणार आहेत. हरित, स्वच्छ आणि सुरक्षित प्रभाग, दर्जेदार रस्ते, नियमित कचरा व्यवस्थापन, पथदिवे, उद्याने व सार्वजनिक जागा विकास, डिजीटल स्मार्ट सेवा समाविष्ठ आहेत. प्रभागातील व्यापारी, कामगार व मध्यमवर्गीयांसाठी बाजारपेठ सुधारणा, पार्किंग व वाहतूक व्यवस्थापन, छोटे व्यावसायिक व फेरीवाल्यांसाठी नियोजनाचा समावेश आहे.