+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Sep 22 person by visibility 274 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कागल येथील गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या ‘शैक्षणिक परिवर्तनाच्या पाउलवाटा’या पुस्तकाला संकल्प फाउंडेशन तिरपण या संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 संकल्प फाउंडेशनतर्फे कथासंग्रह, संशोधन, संकीर्ण, चरित्र, आत्मचरित्र, समिक्षा, ललित, प्रवासवर्णन,अनुवादित, बालसाहित्य व कांदबरी या वाङमय या प्रकारातील पुरस्कार जाहीर केले आहेत.प्रत्येक वाङमय प्रकारात तीन पुरस्कार आहेत. डॉ. कमळकर यांना, संशोधन प्रकारात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याच वाङमय प्रकारात सांगली येथील विजय जंगम यांना पारेगावचा महाकाळेश्वर या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे.
गारगोटीचे बा.स.जठार यांच्या भाकरीची शपथ या साहित्यकृतीला पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रतिष्ठेचा साहित्यभूषण पुरस्कार लातूर येथील ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते यांना जाहीर झाला आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष युवराज सरनोबत, उपाध्यक्षा आदिती सरनोबत व सचिव वैशाली मिसाळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.