+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule08 Oct 24 person by visibility 349 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गोकुळमार्फत म्हैस व गाय अंतिम दूध दर फरकापोटी ११३ कोटी ६६ लाख रुपये इतकी उच्चांकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांंच्या बँकेतील खात्यावर११ ऑक्टोबर २०२४ रोजी जमा करण्यात येणार आहे. गोकुळच्या लाखो दूध उत्पादकांना दिलेली ही दिपावली भेट आहे.” अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
 आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ५० पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. यापैकी प्रतिलिटर ०.२५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात आला आहे.
गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ५८ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपये तर गाय दूधाकरीता ३४ कोटी ७० लाख ९३ हजार रूपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ % प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी २० लाख ३५ हजार व डिंबेचर व्याज ७.७०% प्रमाणे ८ कोटी ९६ लाख ६६ हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती ११ टक्के प्रमाणे डिव्हिडंड ८ कोटी १६ लाख ८९ हजार रूपये असे एकूण ११३ कोटी ६६ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे. अशी भावना चेअरमन  डोंगळे यांनी व्यक्त केली.
या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या ७,९२७ दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण ११३ कोटी ६६ लाख रुपये अंतिम दूध दर फरका व्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ ४२ कोटी रुपये पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, मायक्रोट्रेनिंग, दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान, मिल्को टेस्टर खरेदी, कॉम्प्युटर खरेदी, शैक्षणिक सहल, दूध उत्पादकांना किसान विमा पॉलिसी, भविष्य कल्याण निधी, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान व वासरू संगोपनावरती अनुदान व सेवासुविधावरती खर्च केले आहेत. 
        गोकुळच्या संलग्न दूध संस्थांनी दिपावलीपूर्वी फरकाची रक्कम दूध उत्पादक सभासदांचा आदा करून सभासदाचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले असून दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व सर्व हितचिंतक यांना विजयादशमी दसरा व दिपावलीच्या गोकुळ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या.