Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नीला सोनटक्के यांचे निधनशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शनिवारी पंढरपूरमध्ये सद्बुद्धी दिंडी यात्रा , बाधित शेतकऱ्यांची होणार सभा हॉटेल मालक संघाच्या अध्यक्षपदी सचिन शानभाग, उपाध्यक्षपदी अरुण भोसलेसर्किट बेंचच्या अंतर्गत तक्रार समितीची स्थापना ! अध्यक्षपदी न्यायमूर्ती वृषाली जोशी, समिती सदस्यपदी आठ जण ! !शिरोलीत पोलिसांची कारवाई, ग्रामपंचायत सदस्यासह सहा जण वर्षभरासाठी हद्दपार महापालिका स्तरावरील सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलचे वर्चस्वकेआयटीची जागतिक झेप; वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी सामंजस्य करारमार्केट सेस विरोधातील चार ऑगस्टच्या परिषदेस प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधींचा सहभागकंत्राटदारविरहित रोजगार योजनेबाबत सरकारच्या अभ्यास गटाची  बैठकगोळीबारच्या घटनेने कोल्हापूर हादरले, खाजगी सावकारीतून गोळीबाराची चर्चा

जाहिरात

 

टिंबर मार्केट परिसर आजपासून पाच दिवस लॉकडाऊन

schedule16 Jul 20 person by visibility 885 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील लघुऔद्योगिक वसाहत समजले जाणारे टिंबर मार्केट परिसर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १६ ते २० जुलै या कालावधीत बंद राहणार आहे. नाथागोळे प्रभागात टिंबर मार्केटचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय या भागातील लहान व मोठ्या व्यावसायिकांनी घेतला आहे. कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून पाच दिवस लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी केले. त्याला नागरिक व व्यावसायिकांनी प्रतिसाद देत लॉकडाऊन पाळण्याचे ठरविले आहे.या निर्णयाला टिंबर मार्केट व्यापारी असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. 

गेल्या काही दिवसात गंजीमाळ, राजाराम चौक, संभाजीनगर, वारे वसाहत परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना टिंबर मार्केट परिसर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी टिंबर मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, गोपाळ पटेल, हरिभाई पटेल, लक्ष्मण पटेल व अन्य पदाधिकारी, भागातील सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली

. नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी चर्चा केली. पोलिस प्रशासनानेही सहकार्य केले. आरोग्य विभागाने भागात स्वच्छता, फवारणी केली. माजी महापौर सागर चव्हाण यांनी बॅरिकेटस लावण्यासाठी साहित्य दिले आहे. 

………….. 

परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेचा विचार करुन सामूहिकपणे हा निर्णय घेतला आहे. टिंबर मार्केट परिसरातील सगळे व्यवसाय पाच दिवस बंद राहतील. लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. घरी राहावे. 

 सचिन चव्हाण, माजी नगरसेवक ………………….

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes