Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रपट निर्मिती अर्थसहाय्य योजनेत चित्रपट महामंडळाचा समावेश करा- महामंडळातर्फे मंत्र्यांची घेतली भेटकोल्हापुरात होणार बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम ! सूर्यकांत मांढरेंच्या सिनेमांचे मोफत प्रदर्शन ! !पालखी सोहळयात गोकुळची सेवा, वारकऱ्यांना साहित्य वाटपकोल्हापुरात उभारणार मराठी सिने कलाकारांचे म्युझियम, चित्रनगरीत चित्रपट शिक्षण केंद्र- मंत्री आशिष शेलारधनंजय महाडिक सिनेमा कलाकार ! तरुणपणी केलेली कृष्णाची भूमिका !! कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकाचा मृतदेह सापडलासरकारकडून चित्रपट महामंडळावर अन्याय, अनुदान योजनेवरील सदस्यत्व घेतले काढूनआलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात दहा जुलैला सांगलीत मोर्चाशिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले !  हर्षल सुर्वे, विशाल देवकुळेंना नवी जबाबदारी!शिक्षण सहसंचालक कार्यालयावर अखेर अॅक्शन, तीन अधिकारी निलंबित

जाहिरात

 

कम्प्युटर-डिजीटल साक्षरतेसाठी जयंत आसगावकरांचे कार्य अनुकरणीय-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

schedule27 Jun 25 person by visibility 98 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आर्थिक-कायदेविषयक साक्षरतेइतकेच कम्प्युटर आणि डिजीटल साक्षरता सध्याच्या काळात महत्वाची आहे. शिक्षण, संशोधन आणि विज्ञान-तंत्रज्ञान यावर फोकस राहिला तरच सर्वांगिण प्रगती होते. नेमकी हीच गरज ओळखून आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी प्रिंटर, पुस्तके, स्मार्ट टीव्ही शाळा देऊन मूलभूत घटकांचा पाया खऱ्या अर्थाने घातला आहे, त्यांचे हे शैक्षणिक कार्य अनुकरणीय आहे.’असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.

आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील ८१९ माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्यात आले. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप मुख्याध्यापकांना केले. खासदार शाहू महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सायबर कॉलेजच्या आनंद भुवन सभागृहात कार्यक्रम झाला.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘कोणत्याही देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय विकास शक्य नाही.राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के रक्कम शिक्षणावर खर्च केली तरच देशाचा विकास होतो, परंतु दुर्दैवाने आज भारतात शिक्षणावर फक्त तीन टक्के रक्कम खर्च केली जाते. सध्याच्या राज्यकर्त्यांचे लक्ष हे रस्ते, बांधकाम, पूल आणि त्यामधील कमिशनमध्ये आहे.’

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘शैक्षणिक कार्यासाठी १०० टक्के निधी वापरणारे राज्यातील पहिले शिक्षक आमदार म्हणून  जयंत आसगावकर यांचा उल्लेख करता येईल. त्यांनी विधिमंडळातून विधिमंडळातून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रभावीपणे सोडवले आहेत. स्वच्छ व पारदर्शक कारभार करत नेतृत्व सिद्ध केले. प्रत्येक शिक्षकाने स्वतःला अपडेट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

खासदार शाहू महाराज यांनी आमदार आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघातील पाच ही जिल्ह्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे सांगितले. आमदार आसगावकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा डिजिटल झाली पाहिजे, हा माझा संकल्प आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण व्यवस्थेशी जोडले पाहिजे. माझ्या आमदार निधीतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तसेच प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी मी वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा केला आहे आणि विधान परिषदेत संघर्ष केला आहे.

निशांत गोंधळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष बी.जी. बोराडे, वाय. एल. खाडे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे राहुल पवार, मिलिंद पांगरेकर, सचिव आर. वाय. पाटील,न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य सुर्यकांत चव्हाण, बाबासाहेब पाटील, के. के. पाटील, उदय पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष व्ही. जी पोवार, सुरेश संकपाळ, जयसिंग पवार,  प्राचार्य,  दत्तात्रय घोगरे, सविता पाटील, दत्ता पाटील, देवेंद्र कांबळे, एन. आर. भोसले, सुरेश अभिजीत गायकवाड, विजय जाधव, आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes