Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पालखी सोहळयात गोकुळची सेवा, वारकऱ्यांना साहित्य वाटपकोल्हापुरात उभारणार मराठी सिने कलाकारांचे म्युझियम, चित्रनगरीत चित्रपट शिक्षण केंद्र- मंत्री आशिष शेलारधनंजय महाडिक सिनेमा कलाकार ! तरुणपणी केलेली कृष्णाची भूमिका !! कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकाचा मृतदेह सापडलासरकारकडून चित्रपट महामंडळावर अन्याय, अनुदान योजनेवरील सदस्यत्व घेतले काढूनआलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात दहा जुलैला सांगलीत मोर्चाशिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले !  हर्षल सुर्वे, विशाल देवकुळेंना नवी जबाबदारी!शिक्षण सहसंचालक कार्यालयावर अखेर अॅक्शन, तीन अधिकारी निलंबितजिल्हा परिषदेचा कर्मचारी कावळेसाद दरीत कोसळला,बचाव पथकाकडून शोध कार्यकम्प्युटर-डिजीटल साक्षरतेसाठी जयंत आसगावकरांचे कार्य अनुकरणीय-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

जाहिरात

 

धनंजय महाडिक सिनेमा कलाकार ! तरुणपणी केलेली कृष्णाची भूमिका !!

schedule28 Jun 25 person by visibility 555 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर  : कुस्तीपटू,  कबड्डीपटू आणि राजकारणी म्हणून खासदार धनंजय महाडिक यांची ओळख. त्यांची खेळाची आणि व्यायामाची आवड तर साऱ्यांनाच माहित. संसदरत्न पुरस्कारानेही ते सन्मानित झालेले. मात्र त्यांची ओळख एवढ्या पुरतीच सीमित नाही. तर ते कलाकारही आहेत, सिनेमातही काम केले होते.  चित्रनगरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी या संदर्भातील माहिती दिली.
कोल्हापूर चित्रनगरी येथे शनिवारी 28 जून 2025 रोजी विविध विकासकामांचे उद्घाटन व बहुमजली इमारतीचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरी ही कलानगरी आहे. सिनेमा इंडस्ट्री म्हणजे मोठे उद्योग क्षेत्र आहे. येथे अनेक घटकांना रोजगार मिळतो असे नमूद करत कोल्हापूरसाठी एक्टिंग स्कूल सुरू करावी. यामुळे कोल्हापूरच्या कलाक्षेत्रात आणखी चालना मिळेल अशी मागणी सरकारकडे केली. याचवेळी त्यांनी आपणही कलाकार आहोत. तरुणपणी सिनेमात काम केले आहे. कृष्णाच्या भूमिकेत होतो. त्या सिनेमात अभिनेत्री अलका कुबल होत्या.  कृष्णाच्या भूमिकेसाठी मला मिशा काढून टाकायला सांगितल्या. मला काही ते पटले नाही. आणि मी सिनेमापासून बाजूला झालो. पुढे राजकारणात आलो.
 राजकारणात काम करताना खूप समाधानी, आनंदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारची विविध विकास कामे कोल्हापूरसाठी आणू शकलो. विमानतळ विस्तारीकरण, रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण, बास्केट ब्रिज, कोल्हापूर शहरासाठी नवीन शंभर ई बसेस  यासाठी योगदान देत आले याचे समाधान मोठे आहे. असे महाडिक यांनी नमूद केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes