Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रपट निर्मिती अर्थसहाय्य योजनेत चित्रपट महामंडळाचा समावेश करा- महामंडळातर्फे मंत्र्यांची घेतली भेटकोल्हापुरात वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम ! सूर्यकांत मांढरेंच्या सिनेमांचे मोफत प्रदर्शन ! !पालखी सोहळयात गोकुळची सेवा, वारकऱ्यांना साहित्य वाटपकोल्हापुरात उभारणार मराठी सिने कलाकारांचे म्युझियम, चित्रनगरीत चित्रपट शिक्षण केंद्र- मंत्री आशिष शेलारधनंजय महाडिक सिनेमा कलाकार ! तरुणपणी केलेली कृष्णाची भूमिका !! कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकाचा मृतदेह सापडलासरकारकडून चित्रपट महामंडळावर अन्याय, अनुदान योजनेवरील सदस्यत्व घेतले काढूनआलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात दहा जुलैला सांगलीत मोर्चाशिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले !  हर्षल सुर्वे, विशाल देवकुळेंना नवी जबाबदारी!शिक्षण सहसंचालक कार्यालयावर अखेर अॅक्शन, तीन अधिकारी निलंबित

जाहिरात

 

चित्रपट निर्मिती अर्थसहाय्य योजनेत चित्रपट महामंडळाचा समावेश करा- महामंडळातर्फे मंत्र्यांची घेतली भेट

schedule28 Jun 25 person by visibility 22 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अनुदान अंतर्गत अर्थसहाय्य योजनेच्या अध्यादेशामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नावाचा समावेश करावा अशी मागणी चित्रपट महामंडळाच्या संचालक व व्यावसायिकांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही मराठी सिने व्यावसायिकांची शिखर संस्था आहे. या कार्यालयाचे महत्व व प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी अर्थसहाय्य योजनेत समाविष्ठ करा अशी मागणी करण्यात आली. चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजीत जाधव, सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, वनिता दीक्षित,बबीता काकडे, अमर मोरे, सुनील मुसळे, रवींद्र बोरगावकर, सुभाष गुंदेशा, किशोर सुतार, राहुल मोरे, अमर मठपती, विजय ढेरे, अरुण शिंदे, बबन बिरंजे यांच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेतली. त्यांना निवेदन सादर केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes