Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रपट निर्मिती अर्थसहाय्य योजनेत चित्रपट महामंडळाचा समावेश करा- महामंडळातर्फे मंत्र्यांची घेतली भेटकोल्हापुरात होणार बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम ! सूर्यकांत मांढरेंच्या सिनेमांचे मोफत प्रदर्शन ! !पालखी सोहळयात गोकुळची सेवा, वारकऱ्यांना साहित्य वाटपकोल्हापुरात उभारणार मराठी सिने कलाकारांचे म्युझियम, चित्रनगरीत चित्रपट शिक्षण केंद्र- मंत्री आशिष शेलारधनंजय महाडिक सिनेमा कलाकार ! तरुणपणी केलेली कृष्णाची भूमिका !! कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकाचा मृतदेह सापडलासरकारकडून चित्रपट महामंडळावर अन्याय, अनुदान योजनेवरील सदस्यत्व घेतले काढूनआलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात दहा जुलैला सांगलीत मोर्चाशिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले !  हर्षल सुर्वे, विशाल देवकुळेंना नवी जबाबदारी!शिक्षण सहसंचालक कार्यालयावर अखेर अॅक्शन, तीन अधिकारी निलंबित

जाहिरात

 

शिक्षण सहसंचालक कार्यालयावर अखेर अॅक्शन, तीन अधिकारी निलंबित

schedule28 Jun 25 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कामकाजावरुन नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयावर राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अखेर अॅक्शन घेतली. विनाअनुदानितमधून अनुदानित सेवा दाखविणे, चुकीच्या पद्धतीने कॅसचे लाभ देणे, अर्जित रोखीकरणातील अनियमितता यावरुन शिक्षण सहसंचालक कार्यालयातील  तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये तत्कालिन सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी धैर्यशील कारीदकर, लिपिक बाबासाहेब बीडकर यांचा समावेश आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या कामकाजाच्या तपासणीसाठी शिक्षण संचालकांनी २१ एप्रिल २०२४ रोजी केशव तुपे आणि संदीप पाटील यांची द्विसदस्यीय  समिती नेमली होती. या समितीने तपासणी अहवाल मे २०२५ मध्ये दिला होता. समितीने विविध कामातील अनियमिततेला डॉ. नाकाडे, कारीदकर व बीडकर यांना प्रथमदर्शनी जबाबदार ठरविले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या तिघांवर निलंबनाची कारवाईचा आदेश २६ जून रोजी काढला. निलंबन कालावधीचा आदेश अमलात असेल तोपर्यंत त्यांनी परवानगीशिवाय कार्यालयाचे मुख्यालय सोडता येणार नाही असे आदेशात म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes