Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रपट निर्मिती अर्थसहाय्य योजनेत चित्रपट महामंडळाचा समावेश करा- महामंडळातर्फे मंत्र्यांची घेतली भेटकोल्हापुरात होणार बाराशे सांस्कृतिक कार्यक्रम ! सूर्यकांत मांढरेंच्या सिनेमांचे मोफत प्रदर्शन ! !पालखी सोहळयात गोकुळची सेवा, वारकऱ्यांना साहित्य वाटपकोल्हापुरात उभारणार मराठी सिने कलाकारांचे म्युझियम, चित्रनगरीत चित्रपट शिक्षण केंद्र- मंत्री आशिष शेलारधनंजय महाडिक सिनेमा कलाकार ! तरुणपणी केलेली कृष्णाची भूमिका !! कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकाचा मृतदेह सापडलासरकारकडून चित्रपट महामंडळावर अन्याय, अनुदान योजनेवरील सदस्यत्व घेतले काढूनआलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात दहा जुलैला सांगलीत मोर्चाशिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले !  हर्षल सुर्वे, विशाल देवकुळेंना नवी जबाबदारी!शिक्षण सहसंचालक कार्यालयावर अखेर अॅक्शन, तीन अधिकारी निलंबित

जाहिरात

 

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले !  हर्षल सुर्वे, विशाल देवकुळेंना नवी जबाबदारी!

schedule28 Jun 25 person by visibility 34 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटातंर्गत कोल्हापूर शहर व जिल्हा संघटनेत काही बदल करण्यात आले आहेत. जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा प्रमुखपदी विशाल देवकुळे, कोल्हापूर दक्षिण विधानसभा प्रमुखपदी हर्षल सुर्वे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा शिवसेना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी (२७ जून) झाली. कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे लक्ष होते. जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडे शिवसेना उपनेतेपद आहे. त्यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी होती. गेले काही दिवस या पदावरुन शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. जिल्हाप्रमुखपदासाठी इंगवले, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, राजू यादव इच्छुक होते. जिल्हाप्रमुखपदावर सुर्वे यांच्या नियुक्तीची शक्यता होती. दरम्यान इंगवले यांनी बाजी मारली. ‘मातोश्री’वरुन शुक्रवारी पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा झाली. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्षपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूर उत्तर विधानसभा प्रमुखपदी विशाल देवकुळे व दक्षिण विधानसभा प्रमुखपदी हर्षल सुर्वे यांची घोषणा झाली.

…………….

जिल्हाप्रमुखपदावरुन नाराजी नाट्य

जिल्हाप्रमुखपदासाठी चौघे इच्छुक होते. या पदासाठी काहींनी पक्षातंर्गत फिल्डींग लावली होती. शुक्रवारी जिल्हाप्रमुखपदी इंगवले यांच्या नावाची घोषणा झाली. दरम्यान जिल्हाप्रमुख नियुक्तीवरुन काही जणांनी नाराजी व्यक्त केली. येत्या दोन दिवसात ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. शिवसेनेत गेले काही दिवस गटबाजी वाढली आहे. पक्षाचा कार्यक्रम असो की आंदोलने, प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र गटबाजी पाहावयास मिळत आहे. आता जिल्हाध्यक्षपदावरुन पुन्हा नाराजी नाट्य रंगत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes