सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये शुक्रवारी फार्मा एआयआयटी करिअरवर कार्यशाळा
schedule13 Feb 25 person by visibility 162 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि केआयटीटीई-एआय टेक्नॉलॉजि प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (१४ फेब्रुवारी २०२५) राष्ट्रीय स्तरावरील फार्मा एआयआयटी करिअर कार्यशाळा होत आहे अशी माहिती माहिती आर. एल. तावडे फाउंडेशन्सच्या सचिव श्रीमती शोभा तावडे, संचालक डॉ. ए.आर.कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होत आहे. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. उद्घाटनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोफोर्ज कोल्हापूर शाखा उपाध्यक्ष सचिन पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमधून २५० हून अधि बीफार्मसी आणि एमफार्मसी विद्यार्थी सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील अत्याधुनिक करिअर संधी, क्लिनिकल रिसर्च, मेडिकल कोडिंग, एसएएस सॉफ्टवेअर, डेटा एनालिटिक्स आणि फार्माकोव्हिजिलन्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यशाळेत गायत्री शार्दूल, पीयूष राजपूत, सुचिता शिंदे, प्रतिक्षा सिंग, राहुल जगताप, गायत्री पंडित, सूरज शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण आणि उद्योगक्षमतेला चालना देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करते. कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगजगताची प्रत्यक्ष माहिती आणि त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यास मदत मिळणार असल्याचे प्राचार्य आर. एस. बगली यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कार्यशाळेचे समन्वयक भूषण वर्णे उपस्थित होते.