Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बॅडमिंटन असोसिएशनतर्फे कोल्हापुरात पाच दिवस जिल्हास्तरीय स्पर्धानगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रशासकांच्या आदेशाला केराची टोपली- कोल्हापूर नेक्स्टचा आरोपसभापतीपदी माझी निवड म्हणजे ४२ वर्षाच्या  एकनिष्ठतेचे फळ ! ना नेता बदलला - ना गट !! सुर्यकांत पाटील भैय्या माने पुणे पदवीधरच्या मैदानात ! महायुतीकडून इच्छुक, मतदार नोंदणीसाठी तयारी जोरात !! बाजार समितीच्या सभापती-उपसभापतींच्या सत्कारात शुभेच्छांच्या सरी कमी… राजकीय कडकडाट जास्त !बाजार समितीची दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे ! सभापतीपदी सुर्यकांत पाटील, उपसभापतीपदी राजाराम चव्हाण !! शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ! कुमार आहुजा, वैभव सावर्डेकर, महेश वारकेंचा पुढाकार !!नंदवाळ दिंडीत वारकऱ्यांना गोकुळतर्फे सुगंधी दूध- हरीपाठ वाटप  व्यापक समाजहितासाठी माध्यमांचा जबाबदारीने वापर व्हावा –डॉ. अशोक चौसाळकरविठूनामाचा गजर-माऊलीची पालखी ! पुईखडीवर रंगला रिंगण सोहळा !!

जाहिरात

 

बॅडमिंटन असोसिएशनतर्फे कोल्हापुरात पाच दिवस जिल्हास्तरीय स्पर्धा

schedule08 Jul 25 person by visibility 19 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने ९ ते १३ जुलै  २०२५ दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सर्व गटात मिळून ३२६ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष उद्योगपती सतीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 या स्पर्धेसाठी "महादेवरावजी रामचंद्र महाडीक फाउंडेशन" प्रायोजक म्हणून लाभले आहेत.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खेळाडू मोठ्या संख्येने तयार होत आहेत. कोल्हापूर विविध मार्गाने देशातील अनेक शहरांशी जोडले जात आहे. गेल्या वर्षभरात दोन खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचं नाव उज्वल केलं. रुतिका कांबळे या खेळाडूने नोव्हेंबर २०२४ मध्ये जयपूर येथे झालेल्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या डबल्स मध्ये भारतात प्रथम क्रमांक पटकावला. प्रेरणा आळवेकर या खेळाडूने मलेशियातील क्वालालांपुर येथे झालेल्या "सुपर सिरीज ५००" या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.  कोल्हापुरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार होत आहेत.  या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन विनोद भोसले, ट्रेझरर चंद्रशेखर सोवनी, सेक्रेटरी तन्मय करमरकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes