शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ! कुमार आहुजा, वैभव सावर्डेकर, महेश वारकेंचा पुढाकार !!
schedule07 Jul 25 person by visibility 44 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाजार समितीचे संचालक कुमार किशोर आहुजा, त्यांचे सहकारी वैभव सावर्डेकर, महेश वारके यांच्या वतीने 177 शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. बाजार समिती येथील मल्टिपपज हॉलमध्ये कार्यक्रम झाला. माजी आमदार पाटील, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, बाजार समिती सभापती प्रकाश देसाई, संचालक भारत भुयेकर, सुयोग वाडकर पांडुरंग काशिद, संभाजी पाटील, सचिव तानाजी दळवी, शेतकरी संघाचे संचालक दत्ताजीराव वारके ग्रेन मर्चंट अध्यक्ष संजीव पारीख, विजय कागले, विवेक शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कमर्शियल बँकेचे चेअरमन अतुल शहा, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र डकरे, माजी नगरसेवक तौफिक मुलानी, स्वप्नील तहसीलदार, सागर तहसीलदार, कृष्णा भुसारी कांदा बटाटा व्यापारी अध्यक्ष मनोहर चुग, अशोक आहुजा, संजय पाटील पिशवीकर, दगडु जानकर, सुनिल खांडेकर, अनुप उबरणी, सुंदर पोपटाणी , जाकीर बागवान, शंकर सचदेव, भाजीपाला व्यापारी संताजी जाधव, किरण आद्राळकर, आकाश तोडकर, पंत वालावलकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिक वृषाली कुलकर्णी, ज्ञानगंगा शाळेचे मुख्याध्यापक डी बी बेलेकर, प्रिन्स शिवाजी मंदिर मुख्याध्यापक नितीन चौगले उपस्थित होते. यावेळी माजी आमदार पाटील यांच्या हस्ते बाजार समितीचे सचिव दळवी यांचा सत्कार करण्यात आला.