विरोधी पक्षनेतेपदासाठी इंडिया आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन, सरकारवर टीकास्त्र
schedule09 Jul 25 person by visibility 29 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यात विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीसाठी लाजिरवाणे आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन दुसरे पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्र सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदाबाबत कार्यवाही होत नाही. घोटाळे बाहेर येण्याच्या भीतीने सरकार विरोधी पक्षनेतेपदाबाबत टाळाटाळ करत आहे असे टीकास्त्र सोडत कोल्हापुरात इंडिया आघाडीतर्फे जोरदार आंदोलन झाले. राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ येथे मंगळवारी (८ जुलै) धरणे आंदोलन करण्यात आले. याठिकाणी महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, प्राचार्य टी. एस. पाटील यांची भाषणे झाली. विरोधी पक्षनेतेपद तत्काळ द्यावे अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगले,माजी नगरसेवक विक्रम जरग, ईश्वर परमार, रवी आवळे, शिक्षक नेते भरत रसाळे, कॉम्रेड दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, अतुल दिघे, रघुनाथ कांबळे, सुभाष देसाई, संदीप देसाई, शेकापचे बाबासाहेब देवकर, डी. जी. भास्कर, शिवसेना ठाकरे गटाचे विराज पाटील, अवधूत साळोखे, राजू यादव, सुनील देसाई, रियाज सुभेदार, शिवानंद बनछोडे, आदींचा सहभाग होता.