नियमित सभासदांना पन्नास लाखापर्यंत कर्ज मर्यादा-करवीर शिक्षक पतसंस्थेचा निर्णय
schedule09 Jul 25 person by visibility 18 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुका शिक्षक व शिक्षकेतर सेवक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत नियमित सभासदांना ३५ लाख रुपयांवरुन पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा झाली. फुलेवाडीतील पांडूरंग माने हॉलमध्ये कार्यक्रम झाला.
या सभेत निवृत्त शिक्षक सभासदांना तीन लाख कर्ज, शिक्षण सेवक सभासदांना सात लाख एकूण कर्ज वाटप करण्यासंबंधी ठराव मंजूर केले. सभेत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक नेते राजाराम वरुटे, संस्थापक शामराव जाधव, करवीर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अर्चना पाथरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अमाले लगारे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. पतसंस्थेच्या उपाध्यक्षा वर्षा सणगर यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रकाश आंग्रे, विजय ओतारी, शंकर भोई, अशोक संकपाळ, शब्बीर मुजावर, राजाराम शिर्के, प्रशांत पोतदार, संभाजी पाटील, दत्तात्रय एकशिंगे, मारुती दिंडे, संतोष कांदळकर, प्रकाश निकम, विजय मालाधारी, अनिल कंगणे, डी. एस. पाटील, ज्योत्स्ना महात्मे, नीता ठाणेकर, नूरजहाँ मुलाणी, मानद सचिव बाजीराव लगारे, शामराव जाधव, बाजीराव कांबळे, श्रीकांत चव्हाण उस्थित होते.