वीज कंत्राटी कामगार कायम कधी होणार ? दहा जूनच्या निर्णयाकडे लक्ष !
schedule16 May 25 person by visibility 1511 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महावितरण कंपनीत २०१२ मध्ये सात हजार विद्युत सहाय्यक पदाची भरती निघाली होती. या भरतीमध्ये सर्व कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना त्याच पदावर सेवेत कायम करून घ्यावे अशी याचिका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने हायकोर्टात दाखल केली होती.राज्यभरातील 1362 कामगार यात समाविष्ट आहेत. हायकोर्टाच्या आदेशानुसार ही केस तेरा वर्षे ठाणे औद्योगिक न्यायालयात चालली याचा अंतिम निकाल दहा जून २०२५ रोजी लागणार असल्याने वीज कंत्राटी कामगारांमध्ये त्याकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई यांचे संघटनेला मार्गदर्शन लाभले तर संघटनेतर्फे अॅड.विजय वैद्य यांनी कोर्टात बाजू मांडली आहे.