राधानगरीतील गुडाळमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
schedule16 May 25 person by visibility 136 categoryराजकीय

: महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील स्वर्गीय इंदिरा पाटील दूध संस्थेच्या पदाधिकार्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामरम करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झाला.
कोल्हापुरातील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात खासदार महाडिक यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. सहकारी संस्था आणि गावच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.
राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या स्वर्गीय इंदिरा श्रीपतराव पाटील सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष आणि माजी प्राचार्य एस बी पाटील यांनी कॉंग्रेसची साथ सोडून, भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सागर वागरे, युवराज पाटील, राहूल पाटील, दुलाजी पाटील, राजेंद्र मोहिते, बळवंत पाटील, कृष्णात पाटील, संजय पाटील, शामराव पाटील, दत्तात्रय पाटील, सौरभ सुतार, दिनकर पाटील, ऋतुराज काटकर आणि निवृत्त नौदल अधिकारी आर बी पाटील यांनी, भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, उपाध्यक्ष संभाजीराव आरडे, रवीश पाटील - कौलवकर यांनी मनोगतं व्यक्त केली. कार्यक्रमाला विजय महाडिक, प्रा. डी टी पुंगावकर उपस्थित होते.