गार्डन्स क्लबतर्फे कोल्हापुरात दोन दिवसीय ग्रीन शॉपीचे आयोजन
schedule16 May 25 person by visibility 48 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर प्रतिनिधी : गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे १७ व १८ मे २०२५ या कालावधीत शाहू स्मारक भवन येथे दोन दिवसीय ग्रीन शॉपीचे आयोजन केले आहे. यामध्ये बागेसाठी लागणारे सर्व सामान जसे कि कुंड्या ,फुले-फळझाडांची रोपे,भाजीपाल्याची रोपे,इनडोअर-आउटडोअर, कॅक्टाय सक्यूलॅंटस्, विविध प्रकारची सेंद्रिय खते,औषधे, टेराकोटाचे पॉट्स,बागेसाठी आवश्यक लोखंडी फर्निचर,बांबूच्या वस्तू,टेरारियम च्या बाटल्या, मिनिएचर्स , तसेच सेंद्रिय शेतीमाल, घरगुती खाद्यपदार्थ, कापडी पिशव्या, पर्यावरण पूरक भेटवस्तू उपलब्ध असतील. १७ मे रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ‘’पावसाळा आणि बाग’’:पूर्वतयारी आणि काळजी या विषयावर डॉ मंजुषा देशपांडे यांचे दृकश्राव्य सादरीकरण व चर्चासत्र आहे. १८ मे रोजी ‘’मधमाशांचे मानवी जीवनातील महत्त्व’’ या विषयावर मुंबई येथील डॉ प्रशांत सावंत यांचे दृकश्राव्य सादरीकरण आणि प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम आहे. ही दोन्ही व्याख्याने व प्रवेश विनामूल्य आहे.
या शॉपीचे वैशिष्ट्य म्हणजे, गार्डन्स क्लब तर्फे ‘देशी वाणाच्या बियांचे जतन हे मुख्य उद्दिष्ट आहे. चळवळ शॉपीच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या बिया जमा करून घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्याकडील विविध प्रकारच्या बिया इथे आणून द्याव्यात. तसेच या या प्रदर्शनाचा आणि व्याख्यानांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे गार्डन्स क्लबने केले आहे.