गांधीनगर प्रादेशिक पाणी पुरवठा कामावरुन अधिकारी धारेवर, तर एमजीपीसह मेघा इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयाला टाळे -आमदार सतेज पाटील
schedule16 May 25 person by visibility 237 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच काम, रखडल्याने आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली,. सोमवारपर्यंत वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक लावून कामे सुरळीत करा. अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला सोमवारी १९ मे २०२५ मे रोजी टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला. याशिवाय ज्या गावांमध्ये या योजनेच काम सुरू आहे ते आजपासून बंद पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये आढावा बैठक झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च उपकार्यकारी अभियंता डी.के. पाटील, उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड, उपकार्यकारी अभियंता संजय चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावांच्यासाठी ही महत्वाकांक्षी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यासाठी ३४३ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी देखील मंजूर आहे.. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी या योजनेचे काम करीत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये या योजनेचे काम सुरू झाले. २७ महिन्याची मुदत असतानाही, अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झाले नाही.
यावरून आमदार पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. आम्ही योजना आणली म्हणून राजकारणातून कोणी विरोध करत असेल तर त्याला धडा शिकवू असा दम भरला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तुमच गुणगाणं ऐकायला आम्ही येथे आलेलो नाही अशा शब्दांत फटकारले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी, या योजनेला कोण वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. उजळाईवाडीच्या उपसरपंच भाग्यश्री पारखे यांनी कंपनीने रस्ते उकरून ठेवल्याचे निदर्शनास आणले. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, युवराज गवळी यांनी, उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी बैठकीत केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता मनीष पवार यांनी, वेळेत काम पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली असल्याचे सांगितले. या बैठकीला पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, मोरेवाडी सरपंच ए. व्ही. कांबळे, कनेरीचे सरपंच निशांत पाटील, सरनोबतवाडी सरपंच शुभांगी किरण आडसूळ, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, उचंगावच्या उपसरपंच शीला मोरे, उजळाईवाडी ग्रामपंचायत सदस्य सारिका माने उपस्थित होते.