गगनबावड्यातील वेसरफ तलाव शंभर टक्के भरला
schedule07 Jul 24 person by visibility 394 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गगनबावडा तालुक्यातील वेसरफ लघु पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरला. सकाळी ५.३० वाजता हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून १२५ क्यूसेक्स इतका विसर्ग वाहत आहे. नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे नदीकाठच्या लोकांनां सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा दिला आहे. या ठिकाणी येण्यास पर्यटकांना बंदी आहे. असे
कोल्हापूर पाटबंधारे विभाग( उत्तर) या कार्यालयाततर्फे कळविले आहे