Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वेंगुर्लातील बॅरिस्टर खर्डेकर कॉलेज ठरले सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय ! मुंबई विद्यापीठाकडून बहुमान !!आयआरसीटीसीतर्फे ऑक्टोबरमध्ये रेल्वेद्वारे उत्तर भारत देवभूमी यात्रामेन राजाराममध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहातविद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल ! आता ना कोणी पुढे-ना कोणी मागे !पन्नास टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र !७५ टक्के अनुदानावर दोन शेळी गट वाटप योजना !कोल्हापूर -सांगली जिल्हा परिषदेत येणार महिलाराज, अध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी राखीवकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे रत्नाप्पाण्णा अभिवादन सप्ताहसरसकट टीईटी उत्तीर्णतेबाबत पुनर्विचार व्हावा, कार्यरत शिक्षकांना सूट मिळावीना शोध समिती - ना जाहिरात, कुलगुरू निवड प्रक्रिया लांबणीवर ! नवे कुलगुरू लाभणार २०२६ मध्ये ! !कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अतिक्रमणे वाढली ? महाद्वार रोड, ताराबाई रोड अतिक्रमणमुक्त करा

जाहिरात

 

आयआरसीटीसीतर्फे ऑक्टोबरमध्ये रेल्वेद्वारे उत्तर भारत देवभूमी यात्रा

schedule12 Sep 25 person by visibility 63 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम (आयआरसीटीसी)कार्पोरेशनतर्फे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन योजनेंतर्गत चार ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘उत्तर भारत देवभूमी यात्रा’पर्यटनाची घोषणा करण्यात आली आहे. या यात्रेतंर्गत या धार्मिक-ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्यात येणार आहेत. ११ रात्र आणि बारा दिवसाचा हा सर्वसमावेशक रेल्वे प्रवास सुमारे पाच हजार किलोमीटरचा आहे. अशी माहिती आयआरसीटीसीचे पर्यटन विभागाचे कार्यकारी अधिकारी अमोल हळदणकर यांनी दिली.

या प्रवासासाठी प्रस्थान आणि परतीचे मागे कोल्हापुरातून आहे.या प्रवासात हरिद्वार-ऋषिकेश आणि गंगा आरती, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि वाघा बॉर्डर समारंभ ठिकाणी भेट आहे. कटरा येथे वैष्णोदेवी दर्शन, मथुरा आणि वृदांवन-कृष्णजन्मभूमीचे दर्शन घेता येईल आग्रा येथील ताजमहालला भेट आहे. या पर्यटन रेल्वेमध्ये स्लीपर क्लास, ३एसीं आणि २एसीची सुविधा आहे. रेल्वेत अत्याधुनिक स्वयंपाकघर आहे, प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक आहेत. या रेल्वेत ७५० प्रवाशांची सोय होऊ शकते. इकॉनॉमी क्लाससाठी (स्लीपर) १९,८९० रुपये, स्टॅडर्ड (3एसी) क्लाससाठी ३३,५६० रुपये आणि कम्पर्ट क्लाससाठी (२एसी) ४४, ४६० रुपये तिकिट दर आहे.

या प्रवासात सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री जेवणाची सुविधा आहे. अधिक माहितीसाठी आयआरसीटीसी टुरिझम ऑफिस प्लॅटफॉर्म नंबर १ कोल्हापूर रेल्वे स्टेशन (मो.क्र.८२८७९३१८८६) येथे संपर्क साधावा. उत्तर भारत देवभूमी यात्रेसाठी आतापर्यंत २५० हून अधिक भाविक व पर्यटकांनी बुकिंग केले आहे. रेल्वेतर्फे आयोजित या यात्रेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेवेळी आयआरसीटीसीचे विजय कुंभार, रेल्वे समिती सल्लागाार शिवनाथ बियाणी, उदयसिंह निंबाळकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes