कोल्हापूर -सांगली जिल्हा परिषदेत येणार महिलाराज, अध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी राखीव
schedule12 Sep 25 person by visibility 166 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळत आहे. प्रभाग रचनेनंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले. ग्रामविकास विभागाने राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षण संदर्भातील अधिसूचना जाहीर केले आहे. त्यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव जाहीर झाले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यामुळे आता या पदासाठी मोठी चुरस निर्माण होईल. गेल्या सभागृहातील अनेक सदस्य आता पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तसेच राजकीय कुटुंबातील महिला सदस्य आगामी निवडणुकीत उतरणार हे निश्चित मानले जात आहे. पत्नी, मुलगी, सून यांच्यापैकी एका सदस्याला निवडणुकीत उतरवून अध्यक्षपद आपणालाच कसे मिळेल यासाठी खेळी खेळल्या जाणार आहेत
[जिल्हा परिषदेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .जिल्हा परिषद निवडणूकसाठी प्रभाग रचना जाहीर झाले आहे आता मतदार संघ आरक्षणाकडे नजरा आहेत.