विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल ! आता ना कोणी पुढे-ना कोणी मागे !
schedule12 Sep 25 person by visibility 232 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाळा आणि वर्ग खोल्या म्हटल्या की साधारणपणे एका पाठीमागे एक बसलेले विद्यार्थी…अशा प्रकारची बैठक व्यवस्था पहावयास मिळते. या बैठक व्यवस्थेमुळे पुढे बसणारे विद्यार्थी अव्वल ठरतात तर मागच्या बाकावर बसणारा विद्यार्थी मागे राहतो. असा समज समाजामध्ये निर्माण झालेला दिसून येतो. त्यामुळे मागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याचे अगर प्रकट होण्याचे धाडस होत नाही. अशा मुलांचा विकास होण्यामध्ये अडथळा निर्माण होवू शकतो. त्यामुळे या बैठक व्यवस्थेत बदल करणेचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने हाती घेतला.
केरळ राज्यातील मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बसण्याच्या पद्धतीचे मॉडेल नुसार 'बैंक-बेंचर' या कलंकाला दूर करून यू-आकाराच्या बसण्याच्या पद्धतीचे मॉडेल केरळमधील शाळांमध्ये राबविणेत येत आहे. उपक्रम केरळमधील जवळजवळ बऱ्याच शाळांनी स्वीकारलेला आहे. याच धर्तीवर कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये अशाप्रकारची संकल्पाना राबविण्याचा निश्चिय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी घेतला. त्यास सर्व तालुक्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
या उपक्रमामध्ये शिक्षक वर्गाच्या मध्यभागी उभे राहतात आणि प्रत्येक मुलाला लक्ष वेधता येते. या बैठक व्यवस्थेमुळे शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांचा एक सुंदर दृष्टिकोन मिळू शकतो. तसेच, शिक्षक विद्यार्थ्याची संपूर्ण देहबोली पाहू शकतात. त्यामुे ही बैठक व्यवस्था उपयुक्त आहे. यामुळे बैंक बेंचर्सरहित वर्ग संकल्पना उदयास येत आहे. ज्या शाळांमधील वर्गांची पटसंख्या कमी आहे अशा शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी बैठक रचना तयार केलेली आहे, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या, ‘या उपक्रमामुळे शाळेमध्ये पारंपारिक विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेला फाटा देऊन नाविन्यपूर्ण बैठक व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे सहजरित्या पाहणेस मदत होत आहे. प्रत्येक शाळेमधून सदर उपक्रमास शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी यांचे विशेष योगदान प्राप्त झाले आहे. नो मोअर बॅक बेंचर्स वर्ग रचनेमुळे विद्यार्थ्यांना श्रृतलेखन करणेस अधिक गती निर्माण झाली आहे. तसेच त्यांच्या अध्ययन पातळीमध्ये आमूलाग्र बदल होत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम मिशन ज्ञानकवच उपक्रम म्हणून उत्स्फूर्तपणे राबविणेत येत आहे. ’