कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे रत्नाप्पाण्णा अभिवादन सप्ताह
schedule12 Sep 25 person by visibility 34 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :थोर स्वातंत्र्यसेनानी कौन्सिल ऑफ एज्युकेशन चे संस्थापक अध्यक्ष देशभक्त पद्मश्री डॉ . रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त कौन्सिल ऑफ एज्युकेशन शैक्षणिक संकुलाच्या वतीने ‘अण्णा अभिवादन सप्ताह ‘ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाइट कॉलेजच्यावतीने १४ सप्टेंबर रोजी देशभक्त पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केले असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत . याशिवाय पोस्टर प्रदर्शन, प्रश्नमंजुषा रांगोळी स्पर्धा,, जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा, स्वच्छता अभियान, पाककला, वेशभूषा, केशभूषा, मेहंदी स्पर्धा, भित्तिपत्रक लेखनचे नाइट कॉलेजमध्ये आयोजन केले आहे .
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये संस्कृती महोत्सव, विविध विषयावरील व्याख्याने, व्हिडिओ मेकिंग, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, निबंध,वादविवाद स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन भित्तिपत्रक , वेब डिझाईनिंग, पाककला, मेहंदी व रांगोळी स्पर्धा, मॉडेल मेकिंग, पुस्तक प्रकाशन, भारुड, रॅली अकाउंटन्सी म्युझियम असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. शहाजी लॉ कॉलेजमध्ये वादविवाद, प्रश्नमंजुषा स्पर्धा, भित्तिपत्रक अनावरण, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आणि रत्नाप्पाण्णांच्या जीवनावर आधारित कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन आयोजित केले आहे .
सोमवारी १५ सप्टेंबर २०२५ रोजी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंतीचा मुख्य समारंभ संपन्न होत असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे हे उपस्थित राहत आहेत. त्यांच्या हस्ते राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम भूषवीत आहेत. या प्रसंगी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ.विश्वनाथ मगदूम, उपाध्यक्ष डॉ .प्रसाद मगदूम, संचालक ॲड वैभव पेडणेकर, ॲड अमित बाडकर तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपस्थित राहत आहेत. हा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता प्रा . पुष्पा देशपांडे सभागृहामध्ये होत आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव डॉ विश्वनाथ मगदूम, प्राचार्या डॉ वर्षा मैंदर्गी, प्राचार्य डॉ उत्तम पाटील, प्राचार्य डॉ प्रवीण पाटील व प्राचार्य डॉ भालचंद्र कुलकर्णी यांनी केले आहे .