कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, महापालिका निवडणूक ताकतीने लढविणार- व्ही. बी. पाटील
schedule17 May 25 person by visibility 59 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी (शरद पवार ) काँग्रेस पक्ष ताकतीने लढविणार आहे. कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही. निवडणुका ताकतीने लढवणार. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. इंडिया आघाडी म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील ज्या ठिकाणी शक्य होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगून शरदचंद्र पवार यांची पुन्हा एकदा जादू चालेल.’असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा, शनिवारी कोल्हापुरात झाला. जिल्हा सरचिटणीस सुनील देसाई यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश सांगितला. कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी विविध प्रश्नावर आंदोलन करुन वातावरण राष्ट्रवादीमय करू या असे सांगितले. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी शहराध्यक्ष म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही. कार्यकर्त्यांनी पंधरा दिवसात बूथ कमिटया कराव्यात असे असे आवाहन केले. याप्रसंगी शर्मिला सामंत यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी आर्थिक पाठबळ द्यावे अशी सूचना केली. किसन कल्याणकर यांनी खऱ्या ओबीसींना तिकीट द्यावे अशी भावना व्यक्त केली. राजू जमादार रिक्षा संघटना अध्यक्ष यांनी शरद पवारांची एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य करा असे सांगितले.
उत्तर अध्यक्ष गणेश जाधव यांनी पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याचे काम केले जाईल असे सांगितले. महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले यांनी लढायची तयारी ठेवा असे आवाहन केले. प्रदेश संघटक सचिव विनय कदम यांनी दोन पक्ष एकत्रित होणार नाहीत हे लक्षात ठेवा असे सांगितले. बाजीराव खाडे यांनी शहरातील संघटना मजबूत करण्यासाठी एकत्रित कामाची गरज असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते चंद्रकांत वाकळे, चंद्रकांत सूर्यवंशी, राजवर्धन यादव, सादिक खाटिक यांनी मनोगते व्यक्त केली. शहर उपाध्यक्ष हिदायत मणेर यांनी आभार मानले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, निरंजन कदम करवीर तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, मकरंद जोंधळे, राजाराम पाटोळे, फिरोज सरगूर, दिनकर कांबळे, सरोजिनी जाधव, गणेश नलवडे, अमोल जाधव, अरुणा पाटील, अंजली पोळ, मुसाभाई कुलकर्णी, शिवाजी पोळ, रामराजे बदाले, रियाज कागदी उपस्थित होते.