महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मंगळवार पेठ राजर्षि शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव शंकरराव तथा बाबूराव चव्हाण वस्ताद यांचे वयाच्या ७८ व्यावर्षी निधन झाले
कोल्हापुरातील एक ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू व मार्गदर्शक म्हणून चव्हाण यांची ओळख होती. फुटबॉल खेळाडू घडविण्यात आणि टोल विरोधी लढ्यातील सुरुवात करण्यात पुढे होते . शहरातील क्रीडा सामाजिक क्षेत्रातील लढ्यात ते सहभागी असायचे श्री शाहू को-ऑपरेटिव्ह बँक, बालगोपाल तालीम मंडळ येथे त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आणि विविध क्रीडा संघटनांची त्यांचा निकटचा संबंध होता