विद्यापीठाने नेमली चौकशी समिती, सदस्य देणार भोगावती महाविद्यालयाला भेट
schedule30 Jul 25 person by visibility 230 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. रघुनाथ ढमकले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या समितीन सिनेट सदस्या प्रा. डॉ. माधुरी वाळवेकर व समाजशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. प्रतिमा देसाई या सदस्या आहेत. ही त्रिसदस्यीय समिती लवकरच कॉलेजला भेट देऊन चौकशी करणार आहे. अल्पवयीन मुलांनी चारचाकी वाहनाची स्टंटबाजी करताना कारवरील नियंत्रण सुटले. कार, बस थांब्यावर उभ्या असलेल्या मुलींच्या घोळक्यात शिरली.कारच्या धडकेत, कॉलेजची विद्यार्थिनी प्रज्ञा कांबळे हिचा मृत्यू झाला. विद्यार्थिनीच्या अपघाती मृत्यूनंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी मोर्चाही काढला.