कोल्हापूर अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांना सहा टक्के पगारवाढ
schedule31 Jul 25 person by visibility 70 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेतील कर्मचाऱ्यांना सरसकट सहा टक्के पगारवाढ मिळणार आहे. बँक एम्प्लॉईज युनियन व अर्बन बँकेत यासंबंधीचा करार झाला. कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्थी व पगारवाढ यासंबंधी हा करार करण्यात आला. या करारामुळे कर्मचाऱ्यांना दरमहा किमान १२०० ते जास्तीत जास्त ४४०० रुपये पगारवाढ मिळणार आहे. या करारावर संघटनेतर्फे अध्यक्ष अतुल दिघे, सरचिटणीस एन. एस. मिरजकर, सचिव प्रकाश जाधव यांनी तर बँकेतर्फे अध्यक्ष शिरीष कणेरकर, उपाध्यक्ष जयसिंग माने, मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास वाडकर यांनी सह्या केल्या. कराराच्या पूर्णत्वासाठी बँकेचे संचालक संभाजी जगदाळे, तज्ज्ञ संचालक दीपक चव्हाण यांच्यासह अन्य संचालकांचे सहकार्य झाले. या करारासंबंधी राजारामपुरी येथील बँकेच्या शाखेच्या सभागृहात संयुक्त बैठक झाली. एक एप्रिल २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा करार लागू असणार आहे. या करारातंर्गत वाढलेल्या पगाराची फरक रक्कम एकरकमी मिळणार आहे.