शिवसेना ठाकरे पक्षातर्फे सोमवारी महापालिकेला घेराओ
schedule31 Jul 25 person by visibility 29 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) महापालिकेला घेराओ घालण्यात येणार आहे. मोटारसायकल व रिक्षांचा घेराओ असणार आहे. दुपारी बारा वाजता हे आंदोलन होणार आहे. आंदोलनाची सुरुवात गांधी मैदान येथून होईल. या आंदोलनात दुचाकीस्वार व रिक्षा व्यावसायिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार सुरू आहे. महापालिकेश निगडीत विविध कामे, भ्रष्टाचाराची प्रकरणे यासंबंधी शिवसेनेतर्फे चार दिवसापूर्वी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. पण प्रशासनाकडून समाधानकार उत्तरे मिळाली नाहीत. असा आरोपही इंगवले यांनी केला.