काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत कोल्हापूरचे तिघे जनरल सेक्रेटरीपदी
schedule31 Jul 25 person by visibility 77 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ऑल इंडिया काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेशची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यातंर्गत राजकीय व्यवहार समितीमध्ये ३६ नेत्यांचा समावेश आहे. शिवाय कार्यकारिणीत सोळा वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष व पाच वरिष्ठ प्रवक्ते आहेत. कार्यकारिणीत १०८ जणांवर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली आहे. ९५ सचिव आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष होऊन सहा महिन्याचा कालावधी झाला आहे. काँग्रेसतर्फे मंगळवारी जंम्बो कार्यकारिणी जाहीर झाली. या कार्यकारिणीत जनरल सेक्रेटरी (सरचिटणीस) पदी तिघांची नियुक्ती झाली आहे. प्रदेश कार्यकारिणीवर नूतन सरचिटणीस म्हणून सुर्यकांत पाटील- बुद्धिहाळकर, तौफिक मुलाणी व इचलकरंजी येथील शशांक बावचकर यांचा समावेश आहे. यापूर्वी हे तिघेही प्रदेश कार्यकारिणीत सचिव म्हणून कार्यरत होते.