मोफत उपचारासाठी लाच घेताना डॉक्टरासह दोघांना रंगेहाथ पकडले
schedule20 Jan 25 person by visibility 143 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचाराची सुविधा असताना लाच मागितल्या प्रकरणी गडहिंग्लज येथील एका डॉक्टरासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. डॉ. अजित वसंतराव पाटोळे व इंद्रनील वसंतराव पाटोळे यांच्यावर कारवाईगी झाली. वीस हजार रुपयांची नात्याची मागणी करून 18000 रुपये स्वीकारण्यात आले. त्यावेळी ही कारवाई झाली.
. यातील तक्रारदाराचा मित्र 10 जानेवारी रोजी सााायंकाळी पाचच्या सुमारास चक्कर येऊन खाली पडला. त्यांच्या डाव्या खुब्यास मार लागल्याने, 11 जानेवारी रोजी सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी तेरा जानेवारी रोजी स्वराज्य हॉस्पिटल गडहिंग्लज येथे दाखल केले.तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटोळे यांनी हे ऑपरेशन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून करण्याचे ठरविले. मोफत ऑपरेशन करण्याकरता वीस हजार रुपये द्यावे लागतील, तरच ऑपरेशन होईल असे सांगितले. या योजनेअंतर्गत केलेले औषधोपचार हे पूर्णपणे मोफत असताना सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या हेतूने डॉक्टर पाटोळे व इंद्रजीत पाटोळे यांनी तक्रारदारांच्याकडे वीस रुपयेची मागणी करून, तडजोडी अंती अठरा हजारमधील दहा हजार रुपये पंधरा जानेवारी रोजी व उर्वरित आठ हजार रुपये इंद्रजीत याच्याकडे देण्यास सांगितली. ती रक्कम इंद्रजीत यांनी स्वीकारले. दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सापळा रचून ही कारवाई केली.पोलीस निरीक्षक बापू साळुंखे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलिस हवालदार -सुनील घोसाळकर,पोलिस हवालदार- संदीप काशीद,पो लिस नाईक-सचिन पाटील, पोलिस कॉन्स्टेबल-संदीप पवार, चालक सहायक फौज. गजानन कुराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.