प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण हळदकर, उपाध्यक्षपदी रामदास झेंडे
schedule22 Jan 25 person by visibility 61 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण हळदकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी रामदास झेंडे यांची फेरनिवड झाली. बँकेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सहकारी संस्था शहर उपनिर्बधक श्रीमती डॉ. प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली.
या सभेत अध्यक्षपदासाठी हळदकर यांचे नाव संचालक राजेंद्रकुमार पाटील यांनी सुचविले त्यास संचालक शिवाजी रोडे-पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी झेंडे यांचे नाव संचालक शिवाजी बोलके यांनी सुचविले त्यास संचालक वर्षा केनवडे यांनी अनुमोदन दिले.
सभेस मावळते अध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर, संचालक सुनिल एडके, अर्जुन पाटील, एस.व्ही. पाटील, नंदकुमार वाईगडे, अमर वरुटे, सुरेश कोळी, गौतम वर्धन, गजानन कांबळे, पद्मजा मेढे, सुकाणू समितीचे सर्वधी जोतीराम पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तोंदकर, रघुनाथ खोत, प्रकाश खोत, संजय कुईकर, आनंदराव जाधव, रावसाहेब देसाई, जयवंत पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.
..................
“ बँकेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो. या संधीचा बॅकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन, अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व ठेवींमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. ’’
- बाळकृष्ण हळदकर, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक बँक