मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी ग्रंथाचा शुक्रवारी प्रकाशन सोहळा
schedule22 Jan 25 person by visibility 26 categoryसामाजिक
मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी ग्रंथाचा शुक्रवारी प्रकाशन सोहळा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट, न्यू पॅलेस व महाराष्ट्र इतिहासस प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्य रक्षिका, करवीर राज्य संस्थापिका ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी यांच्या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (२४ जानेवारी २०२५) होत आहे. अशी माहिती शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्टचे अध्यक्ष शाहू छत्रपती व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराणी ताराराणी यांच्या या चरित्र ग्रंथाचे लेखन डॉ जयसिंगराव पवार यांनी केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते न्यू पॅलेस येथे सकाळी ११ वाजता प्रकाशन समारंभ होणार. या प्रकाशन सोहळयासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनाही आमंत्रित केले आहे.महाराणी ताराराणी यांच्या लष्करी नेतृत्वाचा व राज्यकारभार कौशल्याचा गौरव मोगलांच्या खाफीखानसारख्या इतिहासकारांनी केला आहे. महाराणी ताराराणी यांच्या कारकिर्दीत मराठयांच्या फौजा नर्मदा पार करुन माळव्यात शिरल्या. पुलकेशीच्या काळापासून म्हणजे सातशे वर्षात दक्षिणेतील फौजेने नर्मदा पार केली नव्हती. महाराणी ताराराण यांनी मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. या चरित्रग्रंथाने ताराराणींच्या कामगिरीवर प्रकाशझोत पडणार आहे. पत्रकार परिषदेला युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.