धडाडीचा कार्यकर्ता, अभ्यासू लोकप्रतिनिधी ! वाढदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन !!
schedule03 May 25 person by visibility 71 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त (४ मे २०२५ ) रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत कदमवाडी येथील संपर्क कार्यालय परिसरात शिबिर होणार आहे. सत्यजित कदम फाऊंडेशनतर्फे शिबिर होत आहे. कदम यांची धडाडीचा कार्यकर्ता अशी ओळख आहे. महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रभावी काम केले आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून छाप पाडली आहे. गटनेता म्हणून जबाबदारी पेलली आहे. शहर विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी धडपड सुरू असते. महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा नियोजन समितीत काम करताना विविध विकासकामांना निधी मंजूर करण्यात पाठपुरावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. पक्षाने त्यांच्यावर जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे. जिल्हा समन्यवक म्हणून काम करताना पक्ष संघटनाचे काम करत आहेत.