पृथ्वी मोरे-ऋतुजा मोहिते विवाह सोहळा दिमाखात, मान्यवरांची उपस्थिती
schedule05 Sep 25 person by visibility 83 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांचे नातू व संस्थेच्या चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे व परिवहन समितीचे माजी सभापती अजित मोरे यांचे चिरंजीव पृथ्वी आणि शेतकरी सहकारी संघाचे संचालक अजितसिंह जयवंतराव मोहिते यांची सुकन्या चि. सौ. का. ऋतुजा यांचा शुभविवाह सोहळा महासैनिक दरबार हॉल प्रांगणातील शाही मंडपामध्ये दिमाखात झाला.
वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती, युवराज मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती, पालकमंत्री. प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक , माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार राजेश पाटील, राजू आवळे, सुजित मिणचेकर यांनी शुभाशिर्वाद दिले. कुलगुरू डॉ. डी .टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील , कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी ही उपस्थित राहून आशिर्वाद दिले.
विवाह सोहळयाला उद्योगपती रामदास काकडे, उद्योगपती व्ही बी.पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, गुलाबराव पोळ , ॲड.अनिकेत निकम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, चेतन नरके, युवराज पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी महापौर आर. के. पोवार, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, जुना राजवाडा पोलिस निरीक्षक संजीव झाडे, शाहूपुरी पोलिस निरीक्षक डोके, कोजिमाशिचे तज्ज्ञ संचालक दादा लाड आदी उपस्थित होते. विवाह सोहळयाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा नेते दौलत देसाई, अजितराव मोरे, वर्धन देसाई, प्रणव देसाई, वीरेंद्र देसाई , वीरसेन मोहिते , अजितसिंह मोहिते, सुजितसिंह मोहिते ,सुरज मोरे, कमलाकर मोरे यांनी पाहुण्याचे स्वागत केले.