सत्तर लाखाची अॅडव्हान्स रक्कम संचालकांच्याकडे की कर्मचाऱ्यांकडे ? प्रसाद पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवाल
schedule06 Sep 25 person by visibility 53 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरच्या २०२४-२५ चा वार्षिक अहवाल पाहता बँकेचा व्यवस्थापन खर्च वाढला आहे. ठेवीत घट झाली आहे. तसेच ठेवीदारांसह कर्जदारांनीही बँकेकडे पाठ फिरवल्याने कर्ज वितरण कमी दिसत असून नफाही कमी झाला आहे. यावरून बँकेची वाटचाल प्रगतीकडे आहे की अधोगतीकडे असा सवाल बँकेचे माजी संचालक प्रसाद पाटील यांनी केला आहे. मार्च अखेर ७० लाख अॅडव्हान्स दिसत आहे. इतकी मोठी संचालकांकडे की कर्मचाऱ्यांकडे आहे ? ते जाहीर करावे. संबधिताकडून सदर रक्कम व्याजासह वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
रविवारी, सात सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनरल सभेत अहवालतील आकडेवारीवर सनदशीर मार्गाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संचालक मंडळाकडून मिळावीत अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षांची म्हणजे २०२४ मधील बुडीत कर्ज निधी तरतुद दोन कोटी ६६ लाख या अहवाल सालात केली आहे. याचा सकारण खुलासा व्हावा, अहवाल सालात चार कोटी ९७ लाख थकबाकी दिसत आहे. थकबाकी प्रमाण वाढण्याचे कारण स्पष्ट व्हावे. थकबाकीदार यादी जाहीर व्हावी. अहवाल सालात संचालक मिटींग भत्ता चार लाख ४२ हजार, संचालक कमिटी मिटींग भत्ता दोन लाख २९ हजार, शाखा व्यवस्थापन खर्च आठ लाख ८७ हजार, जनरल सभा खर्च तीन लाख ८८ हजार हे खर्च मागील अनेक वर्षाच्या तुलनेत वाढलेले दिसत आहेत. ही सभासदांच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी नव्हे काय? याचा सकारण खुलासा व्हावा. संचाकल सुरेश कोळी यांना बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन ज्यांनी केले तेच संचालक मंडळ, त्यांना संचालक पदासाठी अपात्र ठरवू पाहत आहेत. हा सहकारतील मोठा विनोदच आहे.याबाबत जिल्हा उपनिबंधक यांचेकडे सुनावणी सुरु असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.