प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बबन केकरे
schedule06 Sep 25 person by visibility 47 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाच्या, जिल्हाध्यक्षपदी बबन केकरे यांची निवड करण्यात आली. शिक्षक संघाच्या महामंडळ संघाची सभा नुकतीच कोल्हापुरात झाली. निवडीवेळी शिक्षक संघाचे राज्य नेते राजाराम वरुटे, राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजमोहन पाटील, बाजीराव कांबळे आदी उपस्थित होते. प्रताप राबाडे यांनी केकरे यांची शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगितले. शिक्षक संघासाठी काम, शिक्षकांचे संघटनाची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असल्याचे ते म्हणाले.