कॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी जागृती चव्हाणची कॅम्पसाठी निवड
schedule06 Sep 25 person by visibility 97 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समधील बीकॉम तीनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी जागृती चव्हाणची दोन ते बारा सप्टेंबर २०२५ या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या खडतर थलसेना कॅम्प साठी निवड झाली. यासाठी तिला पाच महाराष्ट्र बटालियन मधील कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित, प्रशासकीय ऑफिसर कर्नल सुहास काळे , ऑनररी लेफ्टनंट सुरेंद्र भोसले ,सुभेदार राजाराम आढाव ,सुभेदार सचिन पाटील, उदय व्हटकर, शंकर गुरव, रंजीत सामंत, महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर कॅप्टन डॉ आर एस नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड.वैभव पेडणेकर, ॲड.अमित बाडकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांचे प्रोत्साहन लाभले.